गणना 7 : 1 (MRV)
मोशेने पवित्र निवास मंडप उभा करण्याचे काम संपविले व त्याच दिवशी परमेश्वराला तो समर्पित केला. त्याने पवित्र निवास मंडप, त्यातील सर्व सामान तसेच वेदी व तिच्या सोबत वापरावयाची उपकरणे ही सर्व तेलाच्या अभिषेकाने पवित्र केली. त्यावरुन त्या वस्तू फकत परमेश्वराच्या उपासनेकरिताच वापरावयाच्या आहेत हे दिसले.
गणना 7 : 2 (MRV)
त्यानंतर जे इस्राएल लोकांचे आपापल्या वंशाचे प्रमुख व कुळांचे पुढारी होते त्यांनी अर्पणे आणिली; हेच लोक शिरगणतीच्या कामात प्रमुख होते.
गणना 7 : 3 (MRV)
त्यांनी परमेश्वरासाठी झाकलेल्या सहा गाड्या भरुन व बारा बैलांनी त्या ओढीत आणिलेली आपापली अर्पणे आणिली. प्रत्येक पुढाऱ्याने एक बैल दिला व दोघांनी मिळून एक गाडी दिली. ही अर्पणे परमेश्वराला देण्यासाठी त्यांनी पवित्र निवास मंडपासमोर आणिली.
गणना 7 : 4 (MRV)
परमेश्वर मोशेला म्हणाला,
गणना 7 : 5 (MRV)
“तू त्यांच्या देणग्या घे; दर्शनमंडपाच्या कामासाठी त्यांचा उपयोग होईल; त्या लेवी लोकांना दे, त्यांच्या कामात त्यांची मदत होईल.”
गणना 7 : 6 (MRV)
मोशेने त्या गाड्या व बैल घेऊन लेवी लोकांना दिले.
गणना 7 : 7 (MRV)
त्याने दोन गाड्या व चार बैल गेर्षोनी वंशाच्या लोकांना दिले; त्यांच्या कामासाठी त्यांना त्यांची गरज होती.
गणना 7 : 8 (MRV)
त्याने चार गाड्या व आठ बैल मरारी वंशाच्या लोकांना दिले; त्यांच्या कामासाठी त्यांना त्यांची गरज होती. अहरोन याजकाचा मुलगा इथामर हा ह्या सर्व लोकांच्या कामाबद्दल जबाबदार होता.
गणना 7 : 9 (MRV)
मोशेने कहाथी वंशाच्या लोकांना बैल किंवा गाड्या दिल्या नाहीत; कारण पवित्र वस्तू आपल्या खांद्यावर वाहून नेण्याचे काम त्यांना देण्यात आले होते.
गणना 7 : 10 (MRV)
मोशेने वेदीचा तेलाने अभिषेक केला. त्याच दिवशी इस्राएल लोकांच्या प्रमुखांनी वेदीला समर्पण करण्यासाठी आपली अर्पणे आणिली; त्यांनी आपली अर्पणे परमेश्वराला वेदीपाशी दिली.
गणना 7 : 11 (MRV)
परमेश्वराने मोशेला सांगितले, “प्रत्येक दिवशी एका प्रमुखाने आपले अर्पण वेदीला समर्पण करण्यासाठी आणावे.”
गणना 7 : 12 (MRV)
(12-83) बारा प्रमुखापैकी प्रत्येकाने ह्याप्रमाणे अर्पणे आणिली; प्रत्येक प्रमुखाने पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशे तीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाचा चांदीचा एक कटोरा आणिला. ती दोन्ही धान्यार्पणाकरिता उपयोगी असलेल्या, तेलात मळलेल्या मैद्याच्या पिठाने भरलेली होती. तसेच प्रत्येकाने धुपाने भरलेले दहा शेकेल वजनाचे एक मोठे सोन्याचे धूपपात्र आणिले. प्रत्येक प्रमुखाने एक गोऱ्हा, एक मेंढा, एक वर्षाचे नर असलेले एक कोकरु ही होमार्पणासाठी, तसेच पापार्पणासाठी एक बकरा; शांत्यार्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक एक वर्षाची नर असलेली पाच कोंकरे आणिली. पहिल्या दिवशी यहुदा वंशाचा प्रमुख अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन ह्याने आपली अर्पणे आणिली.दुसऱ्या दिवशी इस्साखर वंशाचा सूवारचा मुलगा नथनेल ह्याने आपली अर्पणे आणिली.तिसऱ्या दिवशी जबुलून वंशाचा प्रमुख हेलोनाचा मुलगा अलीयाब ह्याने आपली अर्पणे आणिली.चौथ्या दिवशी रऊबेन वंशाचा प्रमुख शदेयुराचा मुलगा अलीसूर ह्याने आपली अर्पणे आणिली.पांचव्या दिवशी शिमोन वंशाचा प्रमुख सुरीशद्दैचा मुलगा शलुमियेल ह्याने आपली अर्पणे आणिली.सहाव्या दिवशी गाद वंशाचा प्रमुख दगुवेलाचा मुलगा एल्यासाप ह्याने आपली अर्पणे आणिली.सातव्या दिवशी एफ्राईम वंशाचा प्रमुख अम्मीहुदाचा मुलगा अलीशामा ह्याने आपली अर्पणे आणिली.आठव्या दिवशी मनश्शे वंशाचा प्रमुख पदाहसुराचा मुलगा गमलीयेल ह्याने आपली अर्पणे आणिली.नवव्या दिवशी बन्यामीन वंशाचा प्रमुख गिदोनीचा मुलगा अबीदान ह्याने आपली अर्पणे आणिली.दहाव्या दिवशी दान वंशाचा प्रमुख अम्मीशद्दैचा मुलगा अहीएजर ह्याने आपली अर्पणे आणिली.अकराव्या दिवशी आशेर वंशाचा प्रमुख आक्रानाचा मुलगा पगीयेल ह्याने आपली अर्पणे आणिली.बाराव्या दिवशी नफताली वंशाचा प्रमुख एनानाचा मुलगा अहीरा ह्याने आपली अर्पणे आणिली.
गणना 7 : 13 (MRV)
गणना 7 : 14 (MRV)
गणना 7 : 15 (MRV)
गणना 7 : 16 (MRV)
गणना 7 : 17 (MRV)
गणना 7 : 18 (MRV)
गणना 7 : 19 (MRV)
गणना 7 : 20 (MRV)
गणना 7 : 21 (MRV)
गणना 7 : 22 (MRV)
गणना 7 : 23 (MRV)
गणना 7 : 24 (MRV)
गणना 7 : 25 (MRV)
गणना 7 : 26 (MRV)
गणना 7 : 27 (MRV)
गणना 7 : 28 (MRV)
गणना 7 : 29 (MRV)
गणना 7 : 30 (MRV)
गणना 7 : 31 (MRV)
गणना 7 : 32 (MRV)
गणना 7 : 33 (MRV)
गणना 7 : 34 (MRV)
गणना 7 : 35 (MRV)
गणना 7 : 36 (MRV)
गणना 7 : 37 (MRV)
गणना 7 : 38 (MRV)
गणना 7 : 39 (MRV)
गणना 7 : 40 (MRV)
गणना 7 : 41 (MRV)
गणना 7 : 42 (MRV)
गणना 7 : 43 (MRV)
गणना 7 : 44 (MRV)
गणना 7 : 45 (MRV)
गणना 7 : 46 (MRV)
गणना 7 : 47 (MRV)
गणना 7 : 48 (MRV)
गणना 7 : 49 (MRV)
गणना 7 : 50 (MRV)
गणना 7 : 51 (MRV)
गणना 7 : 52 (MRV)
गणना 7 : 53 (MRV)
गणना 7 : 54 (MRV)
गणना 7 : 55 (MRV)
गणना 7 : 56 (MRV)
गणना 7 : 57 (MRV)
गणना 7 : 58 (MRV)
गणना 7 : 59 (MRV)
गणना 7 : 60 (MRV)
गणना 7 : 61 (MRV)
गणना 7 : 62 (MRV)
गणना 7 : 63 (MRV)
गणना 7 : 64 (MRV)
गणना 7 : 65 (MRV)
गणना 7 : 66 (MRV)
गणना 7 : 67 (MRV)
गणना 7 : 68 (MRV)
गणना 7 : 69 (MRV)
गणना 7 : 70 (MRV)
गणना 7 : 71 (MRV)
गणना 7 : 72 (MRV)
गणना 7 : 73 (MRV)
गणना 7 : 74 (MRV)
गणना 7 : 75 (MRV)
गणना 7 : 76 (MRV)
गणना 7 : 77 (MRV)
गणना 7 : 78 (MRV)
गणना 7 : 79 (MRV)
गणना 7 : 80 (MRV)
गणना 7 : 81 (MRV)
गणना 7 : 82 (MRV)
गणना 7 : 83 (MRV)
गणना 7 : 84 (MRV)
मोशेने वेदीला तेलाने अभिषेक करुन तिचे समर्पण करण्याच्या वेळी इस्राएल लोकांच्या प्रमुखांनी ही अर्पणे आणिली: चांदीची बारा ताटे, चांदीचे बारा कटोरे, सोन्याची बारा धूपपात्रे.
गणना 7 : 85 (MRV)
प्रत्येक चांदीच्या ताटाचे वजन एकशेतीस शेकेल व प्रत्येक चांदीच्या कटोऱ्याचे वजन सत्तर शेकेल होते. पवित्र स्थानाच्या चलनाप्रमाणे चांदीची ताटे व चांदीचे कटोरे मिळून त्यांचे एकूण वजन जवळ जवळ ‘दोन हजार चारशे’ शेकेल होते.
गणना 7 : 86 (MRV)
अधिकृत वजनाप्रमाणे, प्रत्येकी चार औंस वजन असलेले, धुपाने भरलेले 12सोन्याचे चमचे त्या 12 चमच्यांचे एकूण वजन सुमारे 3 पौंड होते.
गणना 7 : 87 (MRV)
होमार्पणासाठी बारा गोऱ्हे, बारा मेंढे व एक एक वर्षाची बारा नर असलेली कोंकरे एवढे पशू होते; आणि त्यांच्या बरोबर अर्पिण्यासाठी अन्नार्पणेही होती; आणि परमेश्वराला पापार्पण वाहण्यासाठी बारा बकरे होते;
गणना 7 : 88 (MRV)
इस्राएलांच्या प्रमुखांनी शांत्यापर्णासाठीही पशू अर्पण केले. त्यांची एकूण संख्या, चोवीस गोऱ्हे, साठ मेंढे, साठ बकरे व एक एक वर्षाची साठ नर असलेली कोंकरे एवढी होती. मोशेने वेदीला तेलाचा अभिषेक केल्यावर त्यांनी अशा प्रकारे समर्पणे केली.
गणना 7 : 89 (MRV)
मोशे परमेश्वराशी बोलण्यासाठी दर्शनमंडपात गेला त्यावेळी त्याने परमेश्वराची वाणी त्याच्याशी बोलताना ऐकली. ती, पाणी आज्ञापटाच्या कोशावरील कोशावरील पवित्र दयासनावरुन दोन करुब दूतांच्या दरम्यान असलेल्या भागातून येत होती. अशा प्रकारे देव मोशेबरोबर बोलला.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: