नीतिसूत्रे 11 : 1 (MRV)
काही लोक नीट वजन न करणारा तराजू वापरतात. ते लोकांना फसविण्यासाठी असा तराजू वापरतात. परमेश्वराला असले खोटे तराजू आवडत नाही. पण खरा असलेल्या तराजूमुळे परमेश्वराला आनंद होतो.
नीतिसूत्रे 11 : 2 (MRV)
जे लोक गर्विष्ठ आहेत ते बिनमहत्वाचे ठरतील. पण जे लोक विनम्र आहेत ते शहाणेही होतील.
नीतिसूत्रे 11 : 3 (MRV)
चांगल्या, इमानदार लोकांना प्रामाणिकपणा मार्गदर्शन करतो. पण दुष्ट लोक जेव्हा दुसऱ्यांना फसवतात तेव्हा ते स्वत:चाच नाश करुन घेतात.
नीतिसूत्रे 11 : 4 (MRV)
ज्या दिवशी देव लोकांचा न्याय करतो त्या दिवशी पैशाला काही किंमत नसते. परंतु चांगुलपणा लोकांना त्यांच्या मरणापासून वाचवतो.
नीतिसूत्रे 11 : 5 (MRV)
जर चांगला माणूस इमानी असला तर त्याचे आयुष्य सोपे असेल. पण दुष्ट माणसाचा मात्र त्याने केलेल्या वाईट गोष्टीमुळे नाश होईल.
नीतिसूत्रे 11 : 6 (MRV)
इमानी माणसाला चांगुलपणा वाचवतो. पण दुष्ट मात्र त्यांनी केलेल्या वाईट गोष्टींच्या सापळ्यात अडकतात.
नीतिसूत्रे 11 : 7 (MRV)
दुष्ट माणूस मेल्यानंतर त्याला आशेला जागा नसते. तो ज्या ज्या गोष्टींची आशा ठेवतो त्या सर्व कवडीमोल असतात.
नीतिसूत्रे 11 : 8 (MRV)
चांगल्या माणसांचा संकटापासून बचाव होईल. आणि ती संकटे दुष्ट माणसांवर येतील.
नीतिसूत्रे 11 : 9 (MRV)
दुष्ट माणूस काहीतरी बोलून लोकांना दुखवू शकतो. पण चांगल्या माणसांचे त्यांच्या शहाणपणामुळे रक्षण होते.
नीतिसूत्रे 11 : 10 (MRV)
चांगली माणसे जेव्हा यशस्वी होतात तेव्हा सर्व शहर आनंदी होते. जेव्हा दुष्टांचा नाश होतो तेव्हा लोक आनंदाने ओरडू लागतात.
नीतिसूत्रे 11 : 11 (MRV)
इमानदार लोक त्यांचे आशीर्वाद देतात तेव्हा शहर मोठे होते. पण दुष्टांचा बोलण्यामुळे शहराचा नाश होऊ शकतो.
नीतिसूत्रे 11 : 12 (MRV)
ज्या माणसाला चांगली समज बुध्दी नसते तो त्याच्या शेझाऱ्याबद्दल वाईट बोलतो. परंतु शहाण्या माणसाला केव्हा गप्प बसायचे ते कळते.
नीतिसूत्रे 11 : 13 (MRV)
जो माणूस दुसऱ्या लोकांबद्दल काही गुप्त गोष्टी सांगतो तो गुप्तता पाळत नाही. (म्हणून त्याच्यावर विश्वास टाकणे शक्य नसते.) पण जो माणूस विश्वासू असतो तो अफवा पसरवत नाही.
नीतिसूत्रे 11 : 14 (MRV)
कमजोर नेत्यांमुळे देश गर्तेत जातो. पण बरोच चांगले उपदेशक असले तर तो देश सुरक्षित असतो.
नीतिसूत्रे 11 : 15 (MRV)
जर तुम्ही दुसऱ्या माणसाचे कर्ज फेडण्याची हमी घेतलीत तर तुम्हाला त्या बद्दल पश्चात्ताप करावा लागेल. पण जर तुम्ही त्याला तसे व्यवहार करायला नकार दिलात तर तुम्ही सुरक्षित राहाल.
नीतिसूत्रे 11 : 16 (MRV)
.दयाळू आणि कोमल स्त्री आदराला पात्र होते. जे लोक जुलमी आहेत ते केवळ पैसा मिळवतात.
नीतिसूत्रे 11 : 17 (MRV)
दयाळू माणसाला लाभ होईल. पण जो माणूस उलट्या काळजाचा असतो तो स्वत:वर संकटे ओढवून घेतो.
नीतिसूत्रे 11 : 18 (MRV)
दुष्ट माणूस दुसऱ्यांना फसवतो आणि त्यांचे पैसे घेतो. पण जो माणूस न्याची आहे आणि जो योग्य गोष्टी करतो त्याला फलप्राप्ती होते.
नीतिसूत्रे 11 : 19 (MRV)
चांगुलपणा खरोखरच जीवन आणतो. पण दुष्ट माणसे दुष्टपणाकडे वळतात आणि मरण मिळवतात.
नीतिसूत्रे 11 : 20 (MRV)
जे लोक आनंदाने दुष्टपणा करतात त्यांचा परमेश्वर तिरस्कार करतो. पण जे लोक योग्य गोष्ट करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याबद्दल परमेश्वर आनंदी असतो.
नीतिसूत्रे 11 : 21 (MRV)
दुष्टांना खरोखरच शासन होईल. ही गोष्ट खरी आहे. आणि चांगल्या लोकांना सोडून देण्यात येईल.
नीतिसूत्रे 11 : 22 (MRV)
जर स्त्री सुंदर असून मूर्ख असली तर ते डुकराच्या नाकात सुंदर सोन्याची नथ असल्यासारखे असते.
नीतिसूत्रे 11 : 23 (MRV)
चांगल्या लोकांना च्यांच्या इच्छेप्रमाणे गोष्टी मिळाल्या तर त्यांतून अधिक चांगले निर्माण होते. पण दुष्टांना जर त्यांच्या इच्छेप्रमाणे गोष्टी मिळाल्या तर त्यामुळे संकटेच येतात.
नीतिसूत्रे 11 : 24 (MRV)
जर एखादा माणूस उदारहस्ते देत असेल तर त्याला अधिक मिळेल. पण एखाद्याने द्यायला नकार दिला तर तो गरीब होईल.
नीतिसूत्रे 11 : 25 (MRV)
जो उदार होऊन देतो त्याला लाभ होतो. जर तुम्ही दुसऱ्याना मदत केली तर तुम्हाला अधिक फायदा होईल.
नीतिसूत्रे 11 : 26 (MRV)
जो अधाशी माणूस त्याचे धान्य विकायला नकार देतो त्याच्यावर लोक रागावतात. पण जो माणूस दुसऱ्यांना खायला मिळावे म्हणून आपले धान्य विकतो त्याच्याबद्दल लोकांना आनंद वाटतो.
नीतिसूत्रे 11 : 27 (MRV)
जो माणूस दुसऱ्यांचे भले करायचा प्रयत्न करतो त्याचा लोक आदर करतात. जो माणूस वाईट गोष्टी करतो त्याच्या वाटेला फक्त संकटे येतात.
नीतिसूत्रे 11 : 28 (MRV)
जो माणूस आपल्या श्रीमंतीवर विश्वास ठेवतो तो पिवळ्या झालेल्या पानासारखा खाली पडतो. परंतु चांगला माणूस नव्या हिरव्या पानाप्रमाणे वाढत राहील.
नीतिसूत्रे 11 : 29 (MRV)
जर एखाद्याने त्याच्या कुटुंबावर संकटे आणली तर त्याला काहीही मिळणार नाही आणि शेवटी मूर्खाला शहाण्या माणसाची जबरदस्तीने सेवा करावी लागेल.
नीतिसूत्रे 11 : 30 (MRV)
चांगला माणूस ज्या गोष्टी करतो त्या जीवनवृक्षासारख्या असतात. शहाणा माणूस लोकांना नवे आयुष्य देतो.
नीतिसूत्रे 11 : 31 (MRV)
जर पृथ्वीवर चांगल्या माणसांना बक्षीस मिळाले तर दुष्टांनासुध्दा त्याच्या पात्रतेनुसार काही तरी मिळेल.
❮
❯