नीतिसूत्रे 7 : 1 (MRV)
1 मुला, माझे शब्द लक्षात ठेव. मी देतो त्या आज्ञा विसरु नकोस.
नीतिसूत्रे 7 : 2 (MRV)
2 माझ्या आज्ञा पाळ म्हणजे तुला जीवन मिळेल. माझ्या शिकवणुकीला तुझ्या आयुष्यातली एक महत्वाची गोष्ट बनव.
नीतिसूत्रे 7 : 3 (MRV)
3 माझ्या आज्ञा आणि माझी शिकवण सदैव तुझ्याजवळ राहू दे. त्यांना तुझ्या बोटांभोवती बांध. तुझ्या हृदयावर ते कोरुन ठेव.
नीतिसूत्रे 7 : 4 (MRV)
4 शहाणपणाला बहिणीसारखे वागव. समजुतदारपणाला तुझ्या कुटुंबाचाच एक घटक बनव.
नीतिसूत्रे 7 : 5 (MRV)
5 नंतर ते तुझा दुसऱ्या स्त्रीपासून बचाव करतील. ते तुला तिच्या पापाकडे नेणाऱ्या गोड शब्दांपासून वाचवतील.
नीतिसूत्रे 7 : 6 (MRV)
6 एक दिवस मी माझ्या खिडकीतून पाहिले आणि मला
नीतिसूत्रे 7 : 7 (MRV)
7 बरेच मूर्ख तरुण दिसले. मला एक तरुण दिसला जो खूपच मूर्ख होता.
नीतिसूत्रे 7 : 8 (MRV)
8 त्याने वाईट स्त्रीच्या घराचा रस्ता धरला. त्याला भेटण्यासाठी ती घरातून बाहेर आली.
नीतिसूत्रे 7 : 9 (MRV)
9 तेव्हा अंधार होत होता - सूर्य मावळत होता व रात्र पडायला सुरुवात झाली होती.
नीतिसूत्रे 7 : 10 (MRV)
10 ती स्त्री त्याला भेटायला घरातून बाहेर आली. तिने वेश्येसारखा पोशाख केला होता. तिने त्याच्याबरोबर पाप करायचे ठरवले.
नीतिसूत्रे 7 : 11 (MRV)
11 तिला पापाची पर्वा नव्हती. तिला चांगल्या वाईटाची पर्वा नव्हती. ती कधीच घरी राहात नसे.
नीतिसूत्रे 7 : 12 (MRV)
12 ती नेहमी रस्त्यातून हिंडे. ती संकटांना बोलावत सर्वत्र हिंडे.
नीतिसूत्रे 7 : 13 (MRV)
13 तिने त्या तरुणाला पकडले आणि त्याचे चुंबन घेतले. लाज न वाटता ती म्हणाली,
नीतिसूत्रे 7 : 14 (MRV)
14 “आज मी (शांत्यर्पणाची) मेजवानी दिली. मी जे द्यायचे वचन दिले होते ते सर्व मी दिले आणि अजूनही माझ्याकडे खूप अन्न उरले आहे.
नीतिसूत्रे 7 : 15 (MRV)
15 म्हणून मी तुला माझ्याकडे येण्याचे आमंत्रण देण्यासाठी बाहेर आले. मी तुलाच शोधत होते. आणि आता तू मला सापडलास.
नीतिसूत्रे 7 : 16 (MRV)
16 मी माझ्या अंथरुणावर स्वच्छ चादर टाकली आहे. त्या मिसर देशातल्या सुंदर चादरी आहेत.
नीतिसूत्रे 7 : 17 (MRV)
17 मी माझ्या अंथरुणावर अत्तर शिंपडले आहे. मी बोळ, अगरु आणि दालचिनीचा वापर केला आहे.
नीतिसूत्रे 7 : 18 (MRV)
18 चल, आपण सकाळ होईपर्यंत प्रेम करु या. आपण रात्रभर उपभोग घेऊ.
नीतिसूत्रे 7 : 19 (MRV)
19 माझा नवरा दूर गेला आहे. तो व्यवसायासाठी बाहेरगावी गेला आहे.
नीतिसूत्रे 7 : 20 (MRV)
20 त्याने दूरच्या प्रवासासाठी पुरेसे पैसे बरोबर घेतले आहेत. तो दोन आठवडे घरी येणार नाही.”
नीतिसूत्रे 7 : 21 (MRV)
21 त्या बाईने त्या तरुणाला भुलविण्यासाठी हे शब्द वापरले. तिच्या गोड बोलण्याला तो भुलला.
नीतिसूत्रे 7 : 22 (MRV)
22 आणि तो तरुण तिच्या मागोमाग जाळ्यात गेला. तो कत्तलखान्यात नेल्या जाणाऱ्या बैलाप्रमाणे होता. शिकारी ज्याच्या हृदयात बाण सोडायला.
नीतिसूत्रे 7 : 23 (MRV)
23 तयार आहेत अशा हरिणाप्रमाणे तो होता. तो ज्या संकटात होता ते त्याला कळले नाही.
नीतिसूत्रे 7 : 24 (MRV)
24 मुलांनो आता माझे ऐका. माझ्या शब्दांकडे लक्ष द्या.
नीतिसूत्रे 7 : 25 (MRV)
25 दुष्ट स्त्रीला तुमचा कब्जा घेऊ देऊ नका. तिच्या मार्गावरुन जाऊ नका.
नीतिसूत्रे 7 : 26 (MRV)
26 तिने खूप माणसांना पाडले आहे. तिने खूप जणांचा नाश केला आहे.
नीतिसूत्रे 7 : 27 (MRV)
27 तिचे घर म्हणजे मृत्यूचा सापळा आहे. तिचा मार्ग सरळ मरणातच जातो.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: