स्तोत्रसंहिता 100 : 1 (MRV)
हे पृथ्वी, परमेश्वरासाठी गा.
स्तोत्रसंहिता 100 : 2 (MRV)
परमेश्वराची सेवा करताना आनंदी राहा. परमेश्वरासमोर आनंदी गाणी घेऊन या.
स्तोत्रसंहिता 100 : 3 (MRV)
परमेश्वरच देव आहे हे लक्षात घ्या. त्यानेच आपल्याला निर्माण केले. आपण त्याची माणसे आहोत. आपण त्याची मेंढरे आहोत.
स्तोत्रसंहिता 100 : 4 (MRV)
त्याच्या शहरात धन्यवादाची गाणी घेऊन या. त्याच्या मंदिरात स्तुतिगीते घेऊन या. त्याला मान द्या. त्याच्या नावाचा जयजयकार करा.
स्तोत्रसंहिता 100 : 5 (MRV)
परमेश्वर चांगला आहे. त्याचे प्रेम चिरंजीव आहे. आपण त्याच्यावर कायम विश्वास टाकू शकतो.

1 2 3 4 5

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: