स्तोत्रसंहिता 107 : 1 (MRV)
परमेश्वराला धन्यावाद द्या. कारण तो चांगला आहे. त्याचे प्रेम कायम राहाणार आहे.
स्तोत्रसंहिता 107 : 2 (MRV)
परमेश्वराने ज्याचा उध्दार केला आहे अशा प्रत्येक माणसाने हे शब्द म्हटले पाहिजेत. परमेश्वराने त्यांना त्यांच्या शत्रूपासून वाचवले.
स्तोत्रसंहिता 107 : 3 (MRV)
परमेश्वराने त्याच्या माणसांना वेगवेगळ्या देशातून गोळा करुन आणले. त्याने त्याना पूर्व - पश्चिम, उत्तर - दक्षिण या दिशांतून आणले.
स्तोत्रसंहिता 107 : 4 (MRV)
त्यांतले काही वाळवंटात फिरले. ते राहाण्यासाठी जागा शोधत होते पण त्यांना शहर सापडले नाही.
स्तोत्रसंहिता 107 : 5 (MRV)
ते खूप भुकेले आणि तान्हेले होते आणि अशक्त होत होते.
स्तोत्रसंहिता 107 : 6 (MRV)
नंतर त्यांनी परमेश्वराला मदती साठी हाक मारली आणि त्याने त्यांना त्यांच्या संकटातून वाचवले.
स्तोत्रसंहिता 107 : 7 (MRV)
देव त्यांना सरळ जेथे त्यांना राहायचे होते त्या शहरात घेऊन गेला.
स्तोत्रसंहिता 107 : 8 (MRV)
परमेश्वराला त्याच्या प्रेमाबद्दल आणि तो ज्या अद्भुत गोष्टी लोकांसाठी करतो त्याबद्दल धन्यवाद द्या.
स्तोत्रसंहिता 107 : 9 (MRV)
देव तान्हेल्या आत्म्याचे समाधान करतो. देव भुकेल्या आत्म्याला चांगल्या वस्तूंनी भरतो.
स्तोत्रसंहिता 107 : 10 (MRV)
देवाची काही माणसे कैदी होती आणि काळ्याकुटृ तुंरुंगात गजांच्या आडबंद होती.
स्तोत्रसंहिता 107 : 11 (MRV)
का? कारण ते देवाने सांगितलेल्या गोष्टीं विरुध्द भांडले. त्यांनी परात्पर देवाचा उपदेश ऐकायला नकार दिला.
स्तोत्रसंहिता 107 : 12 (MRV)
त्या लोकांनी केलेल्या गोष्टींबद्दल देवाने त्यांचे आयुष्य कठीण केले. ते अडखळले आणि पडले. त्यांना मदत करायला तेथे कुणीही नव्हते.
स्तोत्रसंहिता 107 : 13 (MRV)
ते लोक संकटात होते म्हणून त्यांनी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली आणि त्याने त्यांना त्यांच्या संकटापासून वाचवले.
स्तोत्रसंहिता 107 : 14 (MRV)
देवाने त्यांना त्यांच्या अंधार कोठडीतूनबाहेर काढले, ज्या दोराने त्यांना बांधले होते तो दोर देवाने तोडला.
स्तोत्रसंहिता 107 : 15 (MRV)
त्याच्या प्रेमाबद्दल आणि तो लोकांसाठी ज्याअद्भुत गोष्टी करतो त्याबद्दल परमेश्वराला धन्यवाद द्या.
स्तोत्रसंहिता 107 : 16 (MRV)
देव आपल्याला आपल्या शत्रूंचा पराभव कायला मदत करतो. देव त्यांचे तांब्याचे दरवाजे मोडू शकतो. देव त्यांच्या दरवाज्यावरचे लोखंडीगज तोडू शकतो.
स्तोत्रसंहिता 107 : 17 (MRV)
पापयुक्त जीवन पध्दतीमुळे काही लोक मूर्ख बनतात आणि अपराधी भावनेमुळे त्यांना पीडा होते.
स्तोत्रसंहिता 107 : 18 (MRV)
त्या लोकांनी खायचे नाकारले आणि ते जवळ जवळ मेले.
स्तोत्रसंहिता 107 : 19 (MRV)
ते संकटात होते म्हणून त्यांनी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली आणि त्याने त्यांना संकटातून वाचवले.
स्तोत्रसंहिता 107 : 20 (MRV)
देवाने आज्ञा केली आणि त्यांना बरे केले, म्हणून ते लोक थडग्यात जाण्यापासून बचावले.
स्तोत्रसंहिता 107 : 21 (MRV)
परमेश्वराला त्याच्या प्रेमाबद्दल व तो लोकांसाठी करत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दल धन्यवाद द्या.
स्तोत्रसंहिता 107 : 22 (MRV)
परमेश्वराने जे काही केले त्याबद्दल त्याला धन्यवाद म्हणून बळी अर्पण करा. परमेश्वराने केलेल्या गोष्टी आनंदाने सांगा.
स्तोत्रसंहिता 107 : 23 (MRV)
काही लोक बोटीतून समुद्रापार जातात. त्यांचे व्यवसाय त्यांना महासागरापार घेऊन गेले.
स्तोत्रसंहिता 107 : 24 (MRV)
त्या लोकांनी परमेश्वर काय करु शकतो ते पाहिले. त्याने समुद्रावर ज्या अद्भुत गोष्टी केल्या त्या त्यांनी पाहिल्या.
स्तोत्रसंहिता 107 : 25 (MRV)
देवाने आज्ञा केली आणि जोराचा वारा वाहायला लागला, लाटा उंच उंच जायला लागल्या.
स्तोत्रसंहिता 107 : 26 (MRV)
लाटांनी त्यांना खूप उंच आकाशापर्यंत उंच नेले आणि खोल समुद्रात खाली टाकले. वादळ इतके भयंकर होते की लोकांचे धैर्य नाहीसे झाले.
स्तोत्रसंहिता 107 : 27 (MRV)
ते अडखळत होते आणि प्यायलेल्या माणसासारखे पडत होते. खलाशी म्हणून असलेले त्यांचे कसब निरुपयोगी होते.
स्तोत्रसंहिता 107 : 28 (MRV)
ते संकटात सापडले म्हणून त्यांनी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली आणि त्याने त्यांना संकटापासून वाचवले.
स्तोत्रसंहिता 107 : 29 (MRV)
देवाने वादळ थांबवले. त्याने लाटांना शांत केले.
स्तोत्रसंहिता 107 : 30 (MRV)
समुद्र शांत झाला म्हणून खलाशी आंनदित झाले. देवाने त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या इच्छित स्थळी आणून पोहोचवले.
स्तोत्रसंहिता 107 : 31 (MRV)
परमेश्वराला त्याच्या प्रेमाबद्दल आणि तो लोकांसाठी करीत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दल धन्यवाद द्या.
स्तोत्रसंहिता 107 : 32 (MRV)
देवाची मोठ्या सभेत स्तुती करा. वयोवृध्द प्रमुख एकत्र येतात तेव्हा त्याची स्तुती करा.
स्तोत्रसंहिता 107 : 33 (MRV)
देवाने नदीचे वाळवंटात रुपांतर केले. देवाने झऱ्यांचे वाहाणे बंद केले.
स्तोत्रसंहिता 107 : 34 (MRV)
देवाने सुपीक जमिनीचे क्षारयुक्त ओसाड जमिनीत रुपांतर केले. का? कारण त्या ठिकाणी वाईट लोक राहात होते.
स्तोत्रसंहिता 107 : 35 (MRV)
देवाने वाळवंटाचे पाण्याची तळी असलेल्या जमिनीत रुपांतर केले. देवाने कोरड्या जमिनीतून पाण्याचे झरे वाहायला लावले.
स्तोत्रसंहिता 107 : 36 (MRV)
देवाने भुकेल्या लोकांना चांगल्या प्रदेशातून नेले आणि त्यांनी तिथे राहाण्यासाठी शहर वसवले.
स्तोत्रसंहिता 107 : 37 (MRV)
त्या लोकांनी त्यांच्या शेतात बी पेरले त्यांनी त्यांच्या शेतात द्राक्षं पेरली आणि त्यांना चांगले उत्पन्न आले.
स्तोत्रसंहिता 107 : 38 (MRV)
देवाने त्या लोकांना आशीर्वाद दिला. त्यांचे कुटुंब वाढले. त्यांच्या जवळ खूप जनावरे होती.
स्तोत्रसंहिता 107 : 39 (MRV)
अरिष्टे आणि संकटे यांमुळे त्यांची कुटुंब लहान आणि अशक्त राहिली.
स्तोत्रसंहिता 107 : 40 (MRV)
देवाने त्यांच्या प्रमुखाला लज्जित केले आणि ओशाळवाणे वाटायला लावले आणि त्याला खाली पाहायला लावले. देवाने त्यांना रस्ते नसलेल्या वाळवंटातून हिंडायला लावले.
स्तोत्रसंहिता 107 : 41 (MRV)
पण नंतर देवाने त्या गरीब लोकांची संकटातून मुक्तता केली आणि आता त्यांची कुटुंब मेंढ्यांच्या कळपासारखी मोठी आहेत.
स्तोत्रसंहिता 107 : 42 (MRV)
चांगले लोक हे बघतात आणि आनंदी होतात. पण दुष्ट लोक ते बघतात आणि काय बोलावे ते त्यांना सुचत नाही.
स्तोत्रसंहिता 107 : 43 (MRV)
जर एखादा माणूस शहाणा असला तर त्याला या गोष्टी आठवतील नंतर त्याला देवाचे प्रेम म्हणजे खरोखर काय ते कळून येईल.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: