स्तोत्रसंहिता 108 : 1 (MRV)
देवा, मी तयार आहे. मी गुणगान गायला मनापासून तयार आहे.
स्तोत्रसंहिता 108 : 2 (MRV)
वीणांनो आणि सतारींनो, आपण सुर्याला जाग आणू या.
स्तोत्रसंहिता 108 : 3 (MRV)
परमेश्वरा, आम्ही तुझी इतर देशांत स्तुती करु. आम्ही इतर लोकांत तुझी स्तुती करु.
स्तोत्रसंहिता 108 : 4 (MRV)
परमेश्वरा, तुझे प्रेम आकाशापेक्षाही उंच आहे. तुझे प्रेम सर्वांत उंच अशा ढगापेक्षाही उंच आहे.
स्तोत्रसंहिता 108 : 5 (MRV)
देवा, स्वार्गाच्याही वर उंच जा. सर्व जगाला तुझे वैभव पाहू दे.
स्तोत्रसंहिता 108 : 6 (MRV)
देवा, तुझ्या मित्रांना वाचवण्यासाठी हे कर आणि माझ्या प्रार्थनेला उत्तर दे. आणि तुझी महान शक्ती उध्दार करण्यासाठी वापर.
स्तोत्रसंहिता 108 : 7 (MRV)
देव त्याच्या मंदिरात बोलला, “मी युध्द जिंकेन आणि विजयाबद्दल आनंदी होईन. मी ही जमीन माझ्या माणसांत वाटून टाकीन. मी त्यांना शखेम आणि सुक्कोथाचे खोरे देईन.
स्तोत्रसंहिता 108 : 8 (MRV)
गिलाद आणि मनश्शे माझी असतील. एफ्राईम माझे शिरस्त्राण असेल. यहुदा माझा राजदंड असेल.
स्तोत्रसंहिता 108 : 9 (MRV)
मावब माझे पाय धुण्याचे पात्र असेल. अदोम माझी पादत्राणे नेणारा सेवक असेल. मी पलिष्ट्यांचा पराभव करीन आणि विजयाबद्दल हर्षनाद कहीन.”
स्तोत्रसंहिता 108 : 10 (MRV)
मला शत्रूच्या किल्ल्यात कोण नेईल? मला अदोमशी लढायला कोण नेईल?
स्तोत्रसंहिता 108 : 11 (MRV)
देवा, फक्त तूच मला या गोष्टी करायला मदत करु शकतोस. पण तू आम्हाला सोडून गेलास. तू आमच्या सैन्याबरोबर गेला नाहीस.
स्तोत्रसंहिता 108 : 12 (MRV)
देवा, आम्हाला आमच्या सत्रूचा पराभव करायला मदत कर. लोक आम्हांला मदत करु शकत नाहीत.
स्तोत्रसंहिता 108 : 13 (MRV)
फक्त देवच आम्हाला बलवान करु शकतो. देव आमच्या शत्रूचा पराभव करु शकतो.
❮
❯