स्तोत्रसंहिता 110 : 1 (MRV)
1 परमेश्वर माझ्या प्रभुला म्हणाला, “मी तुझ्या शत्रूंना तुझ्या नियंत्रणाखाली ठेवीन. माझ्याजवळ माझ्या उजव्या बाजूला बस.”
स्तोत्रसंहिता 110 : 2 (MRV)
2 परमेश्वर तुझे राज्य वाढवायला मदत करेल. तुझे राज्य सियोनपाशी सुरु होईल आणि ते तू तुझ्या शत्रूंवर त्यांच्या देशात जाऊन राज्य करशील.
स्तोत्रसंहिता 110 : 3 (MRV)
3 तू तुझ्या सैन्याची जमावाजमव करशील त्यावेळी तुझे लोक स्वयंसेवक बनून दाखल होतील. त्यांचा खास पोशाख परिधान करतील आणि भल्या पहाटे एकत्र जमतील. हे तरुण लोक जमिनीवर जसे दव पडते त्याप्रमाणे तुझ्याभोवती असतील.
स्तोत्रसंहिता 110 : 4 (MRV)
4 परमेश्वराने वचन दिले आहे आणि आता तो त्याचे मन बदलणार नाही. “तू सदैव याजक राहिला आहेस मलकिसदेक होता तसा याजक तू आहेस.”
स्तोत्रसंहिता 110 : 5 (MRV)
5 माझा प्रभु तुझ्या उजव्या बाजूला आहे. तो रागावेल तेव्हा इतर सर्व राजांचा पराभव करील.
स्तोत्रसंहिता 110 : 6 (MRV)
6 देव सर्व राष्ट्रांचा न्यायनिवाडा करील. सर्व जमीन प्रेतांनी झाकली जाईल आणि बलवान राष्ट्रांच्या नेत्यांना देव शिक्षा करील.
स्तोत्रसंहिता 110 : 7 (MRV)
7 राजा वाटेत झऱ्याचे पाणी पितो. तो खरोखरच त्याचे मस्तक उचलेल आणि अतिशय सामर्थ्यवानहोईल.

1 2 3 4 5 6 7

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: