स्तोत्रसंहिता 112 : 1 (MRV)
परमेश्वराची स्तुती करा. जो माणूस परमेश्वराला भितो आणि त्याचा आदर करतो तो आनंदी राहील. त्या माणसाला देवाच्या आज्ञा आवडतात.
स्तोत्रसंहिता 112 : 2 (MRV)
त्याचे वंशज पृथ्वीवर महान होतील. चांगल्या लोकाच्या वंशजांना खरोखरच आशीर्वाद लाभतील.
स्तोत्रसंहिता 112 : 3 (MRV)
त्या माणसाचे कुटुंब श्रीमंत होईल आणि त्याचा चांगुलपणा सदैव राहील.
स्तोत्रसंहिता 112 : 4 (MRV)
चांगल्या लोकांना देव म्हणजे अंधारात चमकणारा प्रकाश वाटतो. देव चांगला, दयाळू आणि कृपाळू आहे.
स्तोत्रसंहिता 112 : 5 (MRV)
माणसाने दयाळू आणि उदार असणे चांगले असते. माणसाने त्याच्या व्यापार उद्दोगात सचोटीने वागणे चांगले असते.
स्तोत्रसंहिता 112 : 6 (MRV)
तो माणूस कधीही पडणार नाही. चांगला माणूस सदैव आठवणीत राहील.
स्तोत्रसंहिता 112 : 7 (MRV)
त्याला वाईट बातमीची भीती वाटणार नाही. त्या माणसाचा विश्वास दृढ असेल कारण त्याचा परमेश्वरावर विश्वास आहे.
स्तोत्रसंहिता 112 : 8 (MRV)
ज्याच्याजवळ दृढ विश्वास आहे त्याला भीती वाटणार नाही. तो त्याच्या शत्रूचा पराभव करेल.
स्तोत्रसंहिता 112 : 9 (MRV)
तो माणूस सहजपणे गरीबांना वस्तू देतो आणि त्याचा चांगुलपणा सदैव असतो.
स्तोत्रसंहिता 112 : 10 (MRV)
दुष्ट लोक हे बघतात आणि रागावतात. ते रागाने त्यांचे दांत खातील आणि नंतर ते नाहीसे होतील दुष्ट लोकांना जे खूप हवेहवेसे वाटते ते मिळणार नाही.

1 2 3 4 5 6 7 8 9 10

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: