स्तोत्रसंहिता 114 : 1 (MRV)
इस्राएलने मिसर देश सोडला. याकोबाने (इस्राएल) तो परका देश सोडला.
स्तोत्रसंहिता 114 : 2 (MRV)
यहुदा त्याचे निवडक राष्ट्र बनले इस्राएल त्याचे राज्य झाले.
स्तोत्रसंहिता 114 : 3 (MRV)
लाल समुद्राने हे पाहिले आणि तो पळून गेला. यार्देन नदी वळली आणि पळाली.
स्तोत्रसंहिता 114 : 4 (MRV)
पर्वत मेंढ्यांसारखा नाचला. टेकड्या कोकरासारख्या नाचल्या.
स्तोत्रसंहिता 114 : 5 (MRV)
लाल समुद्रा, तू का पळून गेलास? यार्देन नदी तू का वळलीस आणि का पळून गेलीस?
स्तोत्रसंहिता 114 : 6 (MRV)
पर्वतांनो तुम्ही मेंढ्यांसारखे का नाचलात? आणि टेकड्यांनो तुम्ही कोकरासारखे का नाचलात?
स्तोत्रसंहिता 114 : 7 (MRV)
पृथ्वी प्रभुसमोर, याकोबाच्या देवासमोर थर थर कापली.
स्तोत्रसंहिता 114 : 8 (MRV)
देवानेच खडकातून पाणी वहायला लावले. देवानेच कठीण खडकातून झरे वाहायला लावले.

1 2 3 4 5 6 7 8

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: