स्तोत्रसंहिता 115 : 1 (MRV)
परमेश्वरा, आम्हाला कुठलाही सन्मान मिळायला नको. सन्मान तुझा आहे, तुझ्या प्रेमामुळे आणि आमच्या तुझ्यावर असलेल्या विश्वासामुळे सन्मान तुझा आहे.
स्तोत्रसंहिता 115 : 2 (MRV)
आमचा देव कुठे आहे, याचा राष्ट्रांना का विचार पडावा?
स्तोत्रसंहिता 115 : 3 (MRV)
देव स्वर्गात आहे आणि त्याला हवे ते तो करतो.
स्तोत्रसंहिता 115 : 4 (MRV)
त्या देशांचे “देव” सोन्या चांदीचे नुसते पुतळे आहेत. कुणीतरी केलेले ते नुसते पुतळे आहेत.
स्तोत्रसंहिता 115 : 5 (MRV)
त्या पुतळ्यांना तोंड आहे पण बोलता येत नाही. त्यांना डोळे आहेत पण बघता येत नाही.
स्तोत्रसंहिता 115 : 6 (MRV)
त्यांना कान आहेत पण ऐकू येत नाही, त्यांना नाक आहे पण वास घेता येत नाही.
स्तोत्रसंहिता 115 : 7 (MRV)
त्यांना हात आहेत पण हाताने स्पर्श करत नाही. त्यांना पाय आहेत पण चालता येत नाही आणि त्यांच्या घशातून कुठलाही आवाज येत नाही.
स्तोत्रसंहिता 115 : 8 (MRV)
ज्या लोकांनी असे पुतळे केले आणि त्यावर जे विश्वास ठेवतात ते त्या पुतळ्यांसारखेच होतात.
स्तोत्रसंहिता 115 : 9 (MRV)
इस्राएलाच्या लोकांनो, परमेश्वरावर विश्वास ठेवा. परमेश्वरच त्यांची शक्ती आणि ढाल आहे.
स्तोत्रसंहिता 115 : 10 (MRV)
अहरोनच्या कुटुंबा, परमेश्वरावर विश्वास ठेव. परमेश्वरच त्यांची शक्ती आणि ढाल आहे.
स्तोत्रसंहिता 115 : 11 (MRV)
परमेश्वराच्या भक्तांनो, परमेश्वरावर विश्वास ठेवा. परमेश्वराच त्यांची शक्ती आणि ढाल आहे.
स्तोत्रसंहिता 115 : 12 (MRV)
परमेश्वर आमची आठवण ठेवतो. परमेश्वर आम्हाला आशीर्वाद देईल. परमेश्वर इस्राएलला आशीर्वाद देईल. परमेश्वर अहरोनच्या कुटुंबाला आशीर्वाद देईल.
स्तोत्रसंहिता 115 : 13 (MRV)
परमेश्वर त्याच्या लहान आणि मोठ्या भक्तांना आशीर्वाद देईल.
स्तोत्रसंहिता 115 : 14 (MRV)
परमेश्वर तुला आणि तुझ्या मुलांना अधिकाधिक आशीर्वाद देईल. अशी मी आशा करतो.
स्तोत्रसंहिता 115 : 15 (MRV)
परमेश्वरानेच स्वर्ग व पृथ्वी निर्माण केली आणि परमेश्वर तुमचे स्वागत करतो.
स्तोत्रसंहिता 115 : 16 (MRV)
स्वर्ग परमेश्वराचा आहे. पण त्यांने लोकांना पृथ्वी दिली.
स्तोत्रसंहिता 115 : 17 (MRV)
मृत लोक परमेश्वराची स्तुती करीत नाहीत. जे लोक खाली थडग्यात आहेत ते परमेश्वराची स्तुती करीत नाहीत.
स्तोत्रसंहिता 115 : 18 (MRV)
पण आता आम्ही परमेश्वराला धन्यवाद देतो आणि आम्ही त्याला सदैव धन्य मानू. परमेश्वराची स्तुती करा.
❮
❯