स्तोत्रसंहिता 118 : 1 (MRV)
परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याचा सन्मान करा. त्याचे खरे प्रेम सदैव चालू राहील.
स्तोत्रसंहिता 118 : 2 (MRV)
इस्राएल, म्हण “त्याचे खरे प्रेम सदैव चालू राहील.”
स्तोत्रसंहिता 118 : 3 (MRV)
याजकांनो, म्हणा, “त्याचे खरे प्रेम सदैव चालू राहील.”
स्तोत्रसंहिता 118 : 4 (MRV)
परमेश्वराची उपासना करणाऱ्या लोकांनो, म्हणा, “त्याचे खरे प्रेम सदैव चालू राहील.”
स्तोत्रसंहिता 118 : 5 (MRV)
मी संकटात होतो म्हणून परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली. परमेश्वराने मला उत्तर दिले आणि मला सोडवले.
स्तोत्रसंहिता 118 : 6 (MRV)
परमेश्वर माझ्या बरोबर आहे म्हणून मी घाबरणार नाही. लोक मला त्रास देण्यासाठी काहीही करु शकणार नाहीत.
स्तोत्रसंहिता 118 : 7 (MRV)
परमेश्वर मला मदत करणारा आहे. माझ्या शत्रूंचा पराभव झालेला मी बघेन.
स्तोत्रसंहिता 118 : 8 (MRV)
परमेश्वरावर विश्वास ठेवणे हे लोकांवर विश्वास ठेवण्यापेक्षा अधिक चांगले.
स्तोत्रसंहिता 118 : 9 (MRV)
परमेश्वरावर विश्वास ठेवणे हे तुमच्या नेत्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा अधिक चांगले.
स्तोत्रसंहिता 118 : 10 (MRV)
बऱ्याच शत्रूंनी मला घेरले होते. परंतु परमेश्वराच्या शक्तीमुळे मी माझ्या शत्रूंचा पराभव केला.
स्तोत्रसंहिता 118 : 11 (MRV)
शत्रूंनी मला पुन्हा पुन्हा घेरले, मी त्यांचा परमेश्वराच्या शक्तीने पराभव केला.
स्तोत्रसंहिता 118 : 12 (MRV)
शत्रूंनी मला मधमाशांच्या थव्याप्रमाणे घेरले होते. परंतु त्यांचा पटकन् जळून जाणाऱ्या झुडपाप्रमाणे लवकरच नाश झाला. मी त्यांचा परमेश्वराच्या शक्तीने पराभव केला.
स्तोत्रसंहिता 118 : 13 (MRV)
माझ्या शत्रूने माझ्यावर हल्ला केला आणि माझा जवळ जवळ सर्वनाश केला परंतु परमेश्वराने मला मदत केली.
स्तोत्रसंहिता 118 : 14 (MRV)
परमेश्वर माझी शक्ती आणि माझे विजयगान आहे. परमेश्वर मला वाचवतो.
स्तोत्रसंहिता 118 : 15 (MRV)
चांगल्या लोकांच्या घरात चाललेला विजयोत्सव तुम्ही ऐकू शकता. परमेश्वराने पुन्हा त्याच्या महान ताकतीचे दर्शन घडवले.
स्तोत्रसंहिता 118 : 16 (MRV)
परमेश्वराचे हात विजयामुळे उंचावले आहेत. परमेश्वराने पुन्हा त्याच्या महान ताकतीचेदर्शन घडवले.
स्तोत्रसंहिता 118 : 17 (MRV)
मी जगेन आणि मरणार नाही आणि परमेश्वराने काय काय केले ते मी सांगेन.
स्तोत्रसंहिता 118 : 18 (MRV)
परमेश्वराने मला शिक्षा केली परंतु त्याने मला मरु दिले नाही.
स्तोत्रसंहिता 118 : 19 (MRV)
चांगल्या दरवाजांनो, माझ्यासाठी उघडा. मी आत येईन आणि परमेश्वराची उपासना करीन.
स्तोत्रसंहिता 118 : 20 (MRV)
ते परमेश्वराचे दरवाजे आहेत आणि केवळ चांगले लोकच त्यातून आत जाऊ शकतात.
स्तोत्रसंहिता 118 : 21 (MRV)
परमेश्वरा, माझ्या प्रार्थनेला उत्तर दिलेस म्हणून मी तुला धन्यवाद देतो. तू माझा उध्दार केलास म्हणून मी तुला धन्यवाद देतो.
स्तोत्रसंहिता 118 : 22 (MRV)
इमारत बांधणाऱ्यांना जो दगड नको होता तो कोनाशिला झाला.
स्तोत्रसंहिता 118 : 23 (MRV)
हे परमेश्वराने घडवून आणले आहे आणि ते अतिशय अद्भुत आहे असे आम्हाला वाटते.
स्तोत्रसंहिता 118 : 24 (MRV)
आजचा दिवस परमेश्वरानेच घडवला आहे. आपण आज मौज करु आणि सुखी होऊ.
स्तोत्रसंहिता 118 : 25 (MRV)
लोक म्हणाले, “परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराने आपला उध्दार केला.
स्तोत्रसंहिता 118 : 26 (MRV)
परमेश्वराचे नाव घेऊन येणाऱ्या माणसाचे स्वागत करा. “याजकांनी उत्तर दिले, “परमेश्वराच्या घरी आम्ही तुझे स्वागत करतो.”
स्तोत्रसंहिता 118 : 27 (MRV)
परमेश्वर देव आहे आणि तो आपला स्वीकार करतो. बळी देण्यासाठी कोकराला बांधून ठेवा आणि त्याला वेदीच्या कोपऱ्यावर न्या.
स्तोत्रसंहिता 118 : 28 (MRV)
परमेश्वरा, तू माझा देव आहेस आणि मी तुला धन्यवाद देतो. तुझी स्तुती करतो.
स्तोत्रसंहिता 118 : 29 (MRV)
परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याची स्तुती करा. त्याचे खरे प्रेम सदैव टिकणारे आहे.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: