स्तोत्रसंहिता 133 : 1 (MRV)
जेव्हा देवाचे लोक शांततेने एकत्र नांदतात, तेव्हा ते खरोखरच खूप चांगले आणि आल्हाददायक असते.
स्तोत्रसंहिता 133 : 2 (MRV)
ते गोड वास असलेल्या, याजकाच्या डोक्यावर ओतलेल्या तेलासारखे, अहरोनाच्या दाढीतून ओघळणाऱ्या तेलासारखे, अहरोनाच्या खासकपड्यातून ओघळणाऱ्या तेलासारखे वाटते.
स्तोत्रसंहिता 133 : 3 (MRV)
हर्मोन पर्वतावरुन सियोनवर पडणाऱ्या हळूवार पावसासारखे वाटते.सियोन पर्वतावरच परमेश्वराने त्याचे आशीर्वाद, त्याचे शाश्वत जीवनाचे आशीर्वाद दिले.
❮
❯