स्तोत्रसंहिता 135 : 1 (MRV)
परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराच्या नावाची स्तुती करा. परमेश्वराच्या सेवकांनो, त्याची स्तुती करा.
स्तोत्रसंहिता 135 : 2 (MRV)
त्यांचे गुणवर्णन करा. परमेश्वराच्या मंदिरात उभे राहाणाऱ्या लोकांनो, आमच्या देवाच्या मंदिराच्या अंगणात उभे राहाणाऱ्यांनो, त्याची स्तुती करा.
स्तोत्रसंहिता 135 : 3 (MRV)
परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याची स्तुती करा. त्याच्या नावाचे गुणगान करा. कारण तो चांगला आहे.
स्तोत्रसंहिता 135 : 4 (MRV)
परमेश्वराने याकोबला निवडले. इस्राएल देवाचा आहे.
स्तोत्रसंहिता 135 : 5 (MRV)
परमेश्वरा महान आहे हे मला माहीत आहे. आमचा प्रभु सगळ्या देवांपेक्षा महान आहे.
स्तोत्रसंहिता 135 : 6 (MRV)
परमेश्वर त्याला हवे ते पृथ्वीवर आणि स्वर्गात समुद्रात आणि खोल महासागरात करत असतो.
स्तोत्रसंहिता 135 : 7 (MRV)
देव सर्व पृथ्वीभर ढग तयार करतो. विजा आणि पाऊस तयार करतो आणि वाराही तयार करतो.
स्तोत्रसंहिता 135 : 8 (MRV)
देवाने मिसर मधले सगळे पहिल्यांदा जन्माला आलेले पुरुष आणि प्राणी मारुन टाकले.
स्तोत्रसंहिता 135 : 9 (MRV)
देवाने मिसरमध्ये अनेक अद्भूत आणि चमत्कारिक गोष्टी केल्या. देवाने फारो आणि त्याच्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत या गोष्टी केल्या.
स्तोत्रसंहिता 135 : 10 (MRV)
देवाने पुष्कळ राष्ट्रांचा पराभव केला. देवाने शक्तिशाली राजांना मारले.
स्तोत्रसंहिता 135 : 11 (MRV)
देवाने अमोऱ्याच्या सिहोन राजाचा पराभव केला. देवाने बाशानच्या ओग राजाचा पराभव केला. देवाने कनानमधल्या सर्व राष्ट्रांचा पराभव केला.
स्तोत्रसंहिता 135 : 12 (MRV)
आणि देवाने त्यांची जमीन इस्राएलला दिली. देवाने ती जमीन त्याच्या लोकांना दिली.
स्तोत्रसंहिता 135 : 13 (MRV)
परमेश्वरा, तुझे नाव सदैव प्रसिध्द राहील. परमेश्वरा, लोकांना तुझी नेहमी आठवण येईल.
स्तोत्रसंहिता 135 : 14 (MRV)
परमेश्वराने राष्ट्रांना शिक्षा केली. पण परमेश्वर त्याच्या सेवकांबरोबर दयाळू होता.
स्तोत्रसंहिता 135 : 15 (MRV)
दुसऱ्या लोकांचे देव केवळ सोन्याचांदीचे पुतळे होते. त्यांचे देव म्हणजे लोकांनी केलेले पुतळे होते.
स्तोत्रसंहिता 135 : 16 (MRV)
त्या पुतळ्यांना तोंड होते पण ते बोलू शकत नव्हते. त्या पुतळ्यांना डोळे होते पण ते पाहू शकत नव्हते.
स्तोत्रसंहिता 135 : 17 (MRV)
पुतळ्यांना कान होते पण ते ऐकू शकत नव्हते. त्या पुतळ्यांना नाक होते पण ते वास घेऊ शकत नव्हते.
स्तोत्रसंहिता 135 : 18 (MRV)
आणि ज्या लोकांनी हे पुतळे केले तेही या पुतळ्यांसारखेच होतील. का? कारण त्यांनी त्या पुतळ्यांवर मदतीसाठी विश्वास टाकला होता.
स्तोत्रसंहिता 135 : 19 (MRV)
इस्राएलाच्या कुटुंबांनो, परमेश्वराचे स्तोत्र गा. अहरोनाच्या कुटुंबांनो, परमेश्वराचे स्तोत्र गा.
स्तोत्रसंहिता 135 : 20 (MRV)
लेवीच्या कुटुंबांनो, परमेश्वराचे स्तोत्र गा. परमेश्वराच्या भक्तांनो, परमेश्वराचे स्तोत्र गा.
स्तोत्रसंहिता 135 : 21 (MRV)
परमेश्वराला सियोनहून त्याचे घर असलेल्या यरुशलेममधून धन्यवाद मिळोत. परमेश्वराची स्तुती करा.
❮
❯