स्तोत्रसंहिता 136 : 1 (MRV)
परमेश्वराची स्तुती करा कारण तो चांगला आहे. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
स्तोत्रसंहिता 136 : 2 (MRV)
देवांच्या देवाची स्तुती करा. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
स्तोत्रसंहिता 136 : 3 (MRV)
परमेश्वरांच्या परमेश्वराची स्तुती करा. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
स्तोत्रसंहिता 136 : 4 (MRV)
देवाची, जो एकमेव अद्भुत चमत्कार करतो त्याची स्तुती करा. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
स्तोत्रसंहिता 136 : 5 (MRV)
ज्याने आकाश निर्माण करण्यासाठी शहाणपणा वापरला त्याची, देवाची स्तुती करा. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
स्तोत्रसंहिता 136 : 6 (MRV)
देवाने समुद्रावर शुष्क जमीन ठेवली. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
स्तोत्रसंहिता 136 : 7 (MRV)
देवाने मोठा प्रकाश निर्माण केला. त्याचे प्रेम सदैव असते.
स्तोत्रसंहिता 136 : 8 (MRV)
दिवसावर राज्य करण्यासाठी देवाने सूर्यांची निर्मिती केली. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
स्तोत्रसंहिता 136 : 9 (MRV)
देवाने रात्रीवर राज्य करण्यासाठी चंद्र आणि चांदण्यांची निर्मिती केली. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
स्तोत्रसंहिता 136 : 10 (MRV)
देवाने मिसरमध्ये जन्मलेल्या पहिल्या पुरुषांना आणि प्राण्यांना मारले. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
स्तोत्रसंहिता 136 : 11 (MRV)
देवाने इस्राएलला मिसरमधून बाहेर काढले. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
स्तोत्रसंहिता 136 : 12 (MRV)
देवाने त्याची महान शक्ती आणि बळ दाखविले. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
स्तोत्रसंहिता 136 : 13 (MRV)
देवाने लाल समुद्र दोन भागात विभागला. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
स्तोत्रसंहिता 136 : 14 (MRV)
देवाने इस्राएलला समुद्रामधून नेले. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
स्तोत्रसंहिता 136 : 15 (MRV)
देवाने फारोला आणि त्याच्या सैन्याला लाल समुद्रात बुडवले. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
स्तोत्रसंहिता 136 : 16 (MRV)
देवाने त्याच्या माणसांना वाळवंटातून नेले. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
स्तोत्रसंहिता 136 : 17 (MRV)
देवाने शक्तिशाली राजांचा पराभव केला. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
स्तोत्रसंहिता 136 : 18 (MRV)
देवाने बलवान राजांचा पराभव केला. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
स्तोत्रसंहिता 136 : 19 (MRV)
देवाने अमोऱ्यांच्या सिहोन राजाचा पराभव केला. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
स्तोत्रसंहिता 136 : 20 (MRV)
देवाने बाशानच्या ओग राजाचा पराभव केला. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
स्तोत्रसंहिता 136 : 21 (MRV)
देवाने त्यांची जमीन इस्राएलला दिली. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
स्तोत्रसंहिता 136 : 22 (MRV)
देवाने ती जमीन इस्राएलला नजराणा म्हणून दिली. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
स्तोत्रसंहिता 136 : 23 (MRV)
आमचा पराभव झाला तेव्हा देवाने आमची आठवण ठेवली. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
स्तोत्रसंहिता 136 : 24 (MRV)
देवाने आम्हाला आमच्या शत्रूंपासून वाचवले. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
स्तोत्रसंहिता 136 : 25 (MRV)
देव प्रत्येक माणसाला अन्न देतो. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
स्तोत्रसंहिता 136 : 26 (MRV)
स्रवर्गातल्या देवाची स्तुती करा. त्याचे खरे प्रेम सदैव असते.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26