स्तोत्रसंहिता 139 : 1 (MRV)
1 परमेश्वरा, तू माझी परीक्षा घेतलीस तुला माझ्याबद्दल सर्व काही माहीत आहे.
स्तोत्रसंहिता 139 : 2 (MRV)
2 मी केव्हा बसतो आणि केव्हा उठतो ते तुला माहीत आहे तुला माझे विचार खूप दुरुनही कळतात.
स्तोत्रसंहिता 139 : 3 (MRV)
3 परमेश्वरा, मी कुठे जातो आणि केव्हा झोपतो ते तुला कळते. मी जे जे करतो ते सर्व तुला माहीत आहे.
स्तोत्रसंहिता 139 : 4 (MRV)
4 परमेश्वरा, मला काय म्हणायचे आहे ते तुला माझे शब्द तोंडातून बाहेर पडायच्या आधीच कळते.
स्तोत्रसंहिता 139 : 5 (MRV)
5 परमेश्वरा, तू माझ्या सभोवताली आहेस. माझ्या पुढे आणि माझ्या मागे आहेस तू तुझा हात हळूवारपणे माझ्यावर ठेवतोस.
स्तोत्रसंहिता 139 : 6 (MRV)
6 तुला जे सर्वकाही माहीत आहे त्याचे मला आश्र्चर्य वाटते ते समजून घेणे मला खूप कठीण वाटते.
स्तोत्रसंहिता 139 : 7 (MRV)
7 मी जिथे जातो तिथे तिथे तुझा आत्मा असतो. परमेश्वरा, माझी तुझ्यापासून सुटका नाही.
स्तोत्रसंहिता 139 : 8 (MRV)
8 परमेश्वरा, मी जर स्वर्गात गेलो तर तिथे तू असतोस मी जर खाली मृत्यूलोकात गेलो तर तिथे ही तू असतोस.
स्तोत्रसंहिता 139 : 9 (MRV)
9 परमेश्वरा, मी जर पूर्वेकडे, जिथे सूर्य उगवतो तिथे गेलो तर तिथे ही तू असतोस. मी जर पश्चिमेकडे समुद्रावर गेलोतर तिथे ही तू असतोस.
स्तोत्रसंहिता 139 : 10 (MRV)
10 तिथेही तुझा उजवा हात मला धरतो. आणि तू मला हाताने धरुन नेतोस.
स्तोत्रसंहिता 139 : 11 (MRV)
11 परमेश्वरा, कदाचित् मी तुझ्यापासून लपण्याचा प्रयत्न करीन आणि म्हणेन, “दिवस रात्रीत बदलला आहे आणि आता काळोख मला खरोखरच लपवेल.”
स्तोत्रसंहिता 139 : 12 (MRV)
12 पण परमेश्वरा, काळोख देखील तुझ्यासाठी पुरेसा दाट नाही तुझ्यासाठी रात्र दिवसासारखीच प्रकाशमय आहे.
स्तोत्रसंहिता 139 : 13 (MRV)
13 परमेश्वरा, तू माझे संपूर्ण शरीर निर्माण केलेस मी माझ्या आईच्या गर्भात होतो तेव्हाच तुला माझ्याबद्दल सर्वकाही माहीत होते.
स्तोत्रसंहिता 139 : 14 (MRV)
14 परमेश्वरा, मी तुझी स्तुती करतो. तू मला अद्भुत आणि अतिशय सुंदररीतीने निर्मिलेस तू जे केलेस ते खूपच अद्भुत आहे हे मला चांगलेच माहीत आहे.
स्तोत्रसंहिता 139 : 15 (MRV)
15 तुला माझ्याबद्दल सारे माहीत आहे माझे शरीर आईच्या गर्भात लपून आकार घेत होते तेव्हा तू माझी हाडे वाढत असताना पाहिलीस.
स्तोत्रसंहिता 139 : 16 (MRV)
16 माझे अवयव वाढत असताना तू पाहिलेस तू तुझ्या पुस्तकात त्यांची यादी केलीस. तू माझी रोज पाहणी केलीस. त्यातला एकही अवयव हरवलेला नाही.
स्तोत्रसंहिता 139 : 17 (MRV)
17 तुझे विचार मला महत्वाचे आहेत, देवा तुला खूप माहिती आहे.
स्तोत्रसंहिता 139 : 18 (MRV)
18 मी जर ती मोजू लागलो तर ती वाळूच्या कणांपेक्षाही जास्त असेल. आणि जेव्हा माझी झोप संपेल तेव्हामी तुझ्याजवळच असेन.
स्तोत्रसंहिता 139 : 19 (MRV)
19 देवा, दुष्ट लोकांना मारुन टाक. त्या खुन्यांना माझ्यापासून दूर ने.
स्तोत्रसंहिता 139 : 20 (MRV)
20 ते वाईट लोक तुझ्याबद्दल वाईट बोलतात. ते तुझ्या नावाविषयी वाईट सांगतात.
स्तोत्रसंहिता 139 : 21 (MRV)
21 परमेश्वरा, जे लोक तुझा तिरस्कार करतात त्यांचा मी तिरस्कार करतो. जे लोक तुझ्याविरुध्द जातात त्यांचा मी तिरस्कार करतो.
स्तोत्रसंहिता 139 : 22 (MRV)
22 मी त्यांचा संपूर्ण तिरस्कार करतो. तुझे शत्रू माझेही शत्रू आहेत.
स्तोत्रसंहिता 139 : 23 (MRV)
23 परमेश्वरा, माझ्याकडे बघ आणि माझे मन जाण माझी परीक्षा घे आणि माझे विचार जाणून घे.
स्तोत्रसंहिता 139 : 24 (MRV)
24 माझ्या मनात काही दुष्ट विचार आहेत का ते बघ आणि मला “सनातन मार्गाचा” रस्ता दाखव.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: