स्तोत्रसंहिता 140 : 1 (MRV)
परमेश्वरा, मला दुष्ट लोकांपासून वाचव दुष्टांपासून माझे रक्षण कर.
स्तोत्रसंहिता 140 : 2 (MRV)
ते लोक वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखत आहेत. ते लोक नेहमी भांडणाला सुरुवात करतात.
स्तोत्रसंहिता 140 : 3 (MRV)
त्यांच्या जिभा विषारी सापासारख्या आहेत. जणु काही त्यांच्या जिभेखाली सापाचे विष आहे.
स्तोत्रसंहिता 140 : 4 (MRV)
परमेश्वरा, मला दुष्ट लोकांपासून वाचव. वाईट लोकांपासून माझे रक्षण कर. ते लोक माझा पाठलाग करतात, आणि मला त्रास द्यायचा प्रयत्न करतात.
स्तोत्रसंहिता 140 : 5 (MRV)
त्या गर्विष्ठ लोकांनी माझ्यासाठी सापळा रचला. त्यांनी मला पकडण्यासाठी जाळे पसरले. त्यांनी माझ्या मार्गात सापळा लावला.
स्तोत्रसंहिता 140 : 6 (MRV)
परमेश्वरा, तू माझा देव आहेस. परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक.
स्तोत्रसंहिता 140 : 7 (MRV)
परमेश्वरा, तू माझा बलदंड प्रभु आहेस. तू माझा रक्षणकर्ता आहेस. लढाईत माझे डोके वाचवणाऱ्या शिरस्त्राणासारखा तू आहेस.
स्तोत्रसंहिता 140 : 8 (MRV)
परमेश्वरा, त्या दुष्ट लोकांच्या इच्छापूर्ण होऊ देऊ नकोस. त्यांच्या योजना यशस्वी होऊ देऊ नकोस.
स्तोत्रसंहिता 140 : 9 (MRV)
परमेश्वरा, माझ्या शत्रूंना जिंकू देऊ नकोस. ते लोक वाईट योजना आखत आहेत. पण त्या वाईट गोष्टी त्यांच्याच बाबतीत घडू दे.
स्तोत्रसंहिता 140 : 10 (MRV)
त्यांच्या डोक्यावर निखारे ओत. माझ्या शत्रूंना आगीत फेकून दे. त्यांना वर चढून पुन्हा कधीही बाहेर येता येणार नाही अशा खड्यात फेकून दे.
स्तोत्रसंहिता 140 : 11 (MRV)
परमेश्वरा, त्या खोटारड्यांना जगू देऊ नकोस. त्या वाईट लोकांचे वाईट होऊ दे.
स्तोत्रसंहिता 140 : 12 (MRV)
परमेश्वर गरीब लोकांचा योग्य तऱ्हेने न्याय करील हे मला माहीत आहे. देव असहाय्य लोकांना साहाय्य करील.
स्तोत्रसंहिता 140 : 13 (MRV)
परमेश्वरा चांगले लोक तुझ्या नावाची स्तुती करतील. चांगले लोक तुझी उपासना करतील.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13