स्तोत्रसंहिता 142 : 1 (MRV)
मी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारीन. मी परमेश्वराची प्रार्थना करीन.
स्तोत्रसंहिता 142 : 2 (MRV)
मी परमेश्वराला माझ्या समस्यांबद्दल सांगेन. मी परमेश्वराला माझ्या संकटांबद्दल सांगेन.
स्तोत्रसंहिता 142 : 3 (MRV)
माझ्या शत्रूंनी माझ्यासाठी सापळा रचला आहे मी आता आशा सोडण्याच्या तयारीत आहे. पण माझे काय होत आहे ते परमेश्वराला माहीत आहे.
स्तोत्रसंहिता 142 : 4 (MRV)
मी भोवताली बघतो पण मला माझे कुणीही मित्र दिसत नाहीत. पळून जाण्यासाठी मला कुठलीही जागा नाही. मला वाचवण्याचा कुणीही प्रयत्न करीत नाही.
स्तोत्रसंहिता 142 : 5 (MRV)
म्हणून मी परमेश्वराकडे मदतीची याचना करतो. परमेश्वरा, तूच माझी सुरक्षित जागा आहेस तूच मला जगू देऊ शकतोस.
स्तोत्रसंहिता 142 : 6 (MRV)
परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक मला तुझी फार गरज आहे. जे लोक माझा पाठलाग करतात त्यांच्यापासून मला वाचव. ते लोक मला फार भारी आहेत.
स्तोत्रसंहिता 142 : 7 (MRV)
हा सापळा टाळण्यासाठी मला मदत कर, म्हणजे मी तुझ्या नावाचे गुणगान करीन. चांगले लोक माझ्या बरोबर आनंदोत्सव करतील कारण तू माझी काळजी घेतलीस.
❮
❯