स्तोत्रसंहिता 145 : 1 (MRV)
देवा, राजा, मी तुझी स्तुती करतो. मी तुझ्या नावाला सदैव धन्यवाद देतो.
स्तोत्रसंहिता 145 : 2 (MRV)
मी तुझी रोज स्तुती करतो. तुझ्या नावाचे रोज गुणगान करतो.
स्तोत्रसंहिता 145 : 3 (MRV)
परमेश्वर महान आहे लोक त्याची खूप स्तुती करतात. त्याने केलेल्या महान गोष्टींची आपण मोजदाद करु शकत नाही.
स्तोत्रसंहिता 145 : 4 (MRV)
परमेश्वरा, लोक तुझी तू केलेल्या गोष्टींबद्दल सदैव स्तुती करतील. तू महान गोष्टी करतोस त्याबद्दल ते सांगतील.
स्तोत्रसंहिता 145 : 5 (MRV)
तुझे राजवैभव आणि तेज अद्भुत आहे. मी तुझ्या अद्भुत चमत्काराबद्दल सांगेन.
स्तोत्रसंहिता 145 : 6 (MRV)
परमेश्वरा तू ज्या चमत्कारपूर्ण गोष्टी करतोस त्याबद्दल लोक सांगतील. तू ज्या महान गोष्टी करतोस त्याबद्दल मी सांगेन.
स्तोत्रसंहिता 145 : 7 (MRV)
तू ज्या चांगल्या गोष्टी करतोस त्याबद्दल लोक सांगतील. लोक तुझ्या चांगुलपणाचे गाणे गातील.
स्तोत्रसंहिता 145 : 8 (MRV)
परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे. परमेश्वर सहनशील आणि प्रेमळ आहे.
स्तोत्रसंहिता 145 : 9 (MRV)
परमेश्वर प्रत्येक मनुष्याशी चांगला वागतो. तो त्याने निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीवर दया करतो.
स्तोत्रसंहिता 145 : 10 (MRV)
परमेश्वरा, तू ज्या गोष्टी करतोस त्यामुळे तुला गौरव प्राप्त होतो. तुझे भक्त तुला धन्यवाद देतात.
स्तोत्रसंहिता 145 : 11 (MRV)
तुझे राज्य किती महान आहे हे ते सांगतात. तू किती महान आहेस हे ते सांगतात.
स्तोत्रसंहिता 145 : 12 (MRV)
म्हणून परमेश्वरा, तू ज्या महान गोष्टी करतोस त्याबद्दल इतर लोकांनाही कळते. तुझे राज्य किती महान आणि अद्भुत आहे हे त्या लोकांना कळते.
स्तोत्रसंहिता 145 : 13 (MRV)
परमेश्वरा, तुझे राज्य सदैव राहील. तू सदैव राज्य करशील.
स्तोत्रसंहिता 145 : 14 (MRV)
जे लोक खाली पडले आहेत त्यांना परमेश्वर उचलतो. जे लोक संकटात आहेत त्यांना परमेश्वर मदत करतो.
स्तोत्रसंहिता 145 : 15 (MRV)
परमेश्वरा, सर्व प्राणीमात्र अन्नासाठी तुझ्याकडे बघतात. आणि तू त्यांना योग्य वेळी त्यांचे अन्न देतोस.
स्तोत्रसंहिता 145 : 16 (MRV)
परमेश्वरा, तू तुझे हात उघडतोस आणि तू प्रत्येक प्राणीमात्राला जे लागेल ते सर्व देतोस.
स्तोत्रसंहिता 145 : 17 (MRV)
परमेश्वर जे काही करतो ते सर्व चांगले असते. तो जे करतो ते सर्व तो किती चांगला आहे, ते दाखवते.
स्तोत्रसंहिता 145 : 18 (MRV)
जे कोणी परमेश्वराला मदतीसाठी बोलावतात, त्या सर्वांच्या तो खूप जवळ असतो. जो त्याची अगदी मनापासून प्रार्थना करतो, त्याच्या अगदी जवळ तो असतो.
स्तोत्रसंहिता 145 : 19 (MRV)
भक्तांना जे हवे असते ते परमेश्वर करतो. परमेश्वर त्याच्या भक्तांचे ऐकतो. तो त्यांच्या प्रार्थमेला उत्तर देतो आणि त्यांना वाचवतो.
स्तोत्रसंहिता 145 : 20 (MRV)
जे परमेश्वरावर प्रेम करतात त्यांचे तो रक्षण करतो. परंतु परमेश्वर वाईट लोकांचा नाश करतो.
स्तोत्रसंहिता 145 : 21 (MRV)
मी परमेश्वराची स्तुती करेन. प्रत्येकाने त्याच्या पवित्र नावाचा सतत जयजयकार करावा असे मला वाटते.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21