स्तोत्रसंहिता 146 : 1 (MRV)
परमेश्वराची स्तुती करा. माझ्या आत्म्या, परमेश्वराची स्तुती कर.
स्तोत्रसंहिता 146 : 2 (MRV)
मी आयुष्यभर परमेश्वराची स्तुती करीन. मी आयुष्यभर त्याचे गुणगान करीन.
स्तोत्रसंहिता 146 : 3 (MRV)
तुमच्या नेत्यांवर मदतीसाठी अवलंबून राहू नका. लोकांवर विश्वास टाकू नका. का? कारण लोक तुम्हाला वाचवू शकत नाहीत.
स्तोत्रसंहिता 146 : 4 (MRV)
लोक मरतात आणि त्यांचे दफन केले जाते आणि नंतर मदतीच्या त्यांच्या सगळ्या योजनाही जातात.
स्तोत्रसंहिता 146 : 5 (MRV)
पण जे लोक देवाला मदतीबद्दल विचारतात ते सुखी असतात. ते लोक परमेश्वरावर, त्यांच्या देवावर अवलंबून असतात.
स्तोत्रसंहिता 146 : 6 (MRV)
परमेश्वराने स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केली. परमेश्वराने समुद्र आणि त्यातल्या सर्व गोष्टी निर्माण केल्या. परमेश्वर त्यांचे सदैव रक्षण करील.
स्तोत्रसंहिता 146 : 7 (MRV)
खी कष्टी आहेत. त्यांच्यासाठी परमेश्वर योग्य गोष्टी करतो. तो भुकेल्यांना अन्न देतो. तुरुंगात बंद असलेल्यांना तो सोडवतो.
स्तोत्रसंहिता 146 : 8 (MRV)
परमेश्वर आंधळ्यांना पुन्हा दिसू लागण्यासाठी मदत करतो. संकटात असलेल्या लोकांना परमेश्वर मदत करतो. परमेश्वराला चांगले लोक आवडतात.
स्तोत्रसंहिता 146 : 9 (MRV)
परमेश्वर आपल्या देशातल्या परक्यांचे रक्षण करतो. परमेश्वर विधवांची आणि अनांथांची काळजी घेतो. परंतु परमेश्वर वाईट लोकांचा नाश करतो.
स्तोत्रसंहिता 146 : 10 (MRV)
परमेश्वर सदैव राज्य करील सियोन तुझा देव सदैव राज्य करीत राहील परमेश्वराची स्तुती करा.

1 2 3 4 5 6 7 8 9 10

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: