स्तोत्रसंहिता 147 : 1 (MRV)
परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याची स्तुती करा. आपल्या देवाचे गुणगान करा. त्याची स्तुती करणे चांगले आणि आल्हाददायक आहे.
स्तोत्रसंहिता 147 : 2 (MRV)
परमेश्वराने यरुशलेम बांधले, इस्राएलाच्या ज्या लोकांना कैदी म्हणून नेले होते. त्यांना देवाने परत आणले.
स्तोत्रसंहिता 147 : 3 (MRV)
देव त्यांच्या विदीर्ण ह्दयावर फुंकर घालतो आणि त्यांच्या जखमांना मलम पट्ी करतो.
स्तोत्रसंहिता 147 : 4 (MRV)
देव तारे मोजतो आणि त्याला प्रत्येक ताऱ्याचे नाव माहीत असते.
स्तोत्रसंहिता 147 : 5 (MRV)
आपला प्रभु खूप मोठा आहे. तो फार शक्तीवान आहे. त्याला माहीत असलेल्या गोष्टींना मर्यादा नाही.
स्तोत्रसंहिता 147 : 6 (MRV)
परमेश्वर नम्र लोकांना मदत करतो. परंतु तो वाईट लोकांना अडचणीत टाकतो.
स्तोत्रसंहिता 147 : 7 (MRV)
परमेश्वराला धन्यावाद द्या. आपल्या देवाची वीणेवर स्तुती करा.
स्तोत्रसंहिता 147 : 8 (MRV)
देव ढगांनी आकाश भरुन टाकतो. देव पृथ्वीसाठी पाऊस निर्माण करतो. देव डोंगरावर गवत उगवतो.
स्तोत्रसंहिता 147 : 9 (MRV)
देव प्राण्यांना अन्न देतो, देव लहान पक्ष्यांना अन्न भरवतो.
स्तोत्रसंहिता 147 : 10 (MRV)
युध्दातले घोडे आणि बलवान सैनिक त्याला आनंद देत नाहीत.
स्तोत्रसंहिता 147 : 11 (MRV)
जे लोक त्याची प्रार्थना करतात त्यांच्या बरोबर परमेश्वर आनंदी असतो. जे लोक त्याच्या खऱ्या प्रेमावर विश्वास ठेवतात त्यांच्याबरोबर देव आनंदी असतो.
स्तोत्रसंहिता 147 : 12 (MRV)
यरुशलेम, परमेश्वराची स्तुती कर. सियोन तुझ्या देवाची स्तुती कर.
स्तोत्रसंहिता 147 : 13 (MRV)
यरुशलेम, देव तुझे दरवाजे बुलंद बनवतो आणि देव तुझ्या शहरातल्या लोकांना आशीर्वाद देतो.
स्तोत्रसंहिता 147 : 14 (MRV)
देवाने तुझ्या देशात शांती आणली. म्हणून युध्दात शत्रूंनी तुझे धान्य नेले नाही. आणि अन्न म्हणून तुझ्याकडे भरपूर धान्य आहे.
स्तोत्रसंहिता 147 : 15 (MRV)
देव पृथ्वीला आज्ञा करतो आणि ती त्या आज्ञा त्वरित पाळते.
स्तोत्रसंहिता 147 : 16 (MRV)
जमीन लोकरी सारखी संपूर्ण पांढरी होई पर्यंत देव हिमवर्षाव करतो. देव गोठलेले बर्फधुळीसारखे हवेत उडू देतो.
स्तोत्रसंहिता 147 : 17 (MRV)
देव, आकाशतून दगडाप्रमाणे गारांचावर्षाव करतो. तो जी थंडी पाठवतो तिचा सामना कुणीही करु शकत नाही.
स्तोत्रसंहिता 147 : 18 (MRV)
नंतर देव दुसरी आज्ञा देतो आणि पुन्हा गरम वारे वाहू लागतात. बर्फ वितळायला लागते आणि पाणी वाहायला लागते.
स्तोत्रसंहिता 147 : 19 (MRV)
देवाने याकोबाला (इस्राएल) त्याची आज्ञा दिली. देवाने इस्राएलला त्याचे नियम दिले.
स्तोत्रसंहिता 147 : 20 (MRV)
देवाने हे दुसऱ्या कोणत्याही देशासाठी केले नाही. देवाने दुसऱ्या लोकांना त्याचे नियम शिकवले नाहीत. परमेश्वराची स्तुती करा.
❮
❯