स्तोत्रसंहिता 16 : 1 (MRV)
देवा, माझे रक्षण कर कारण मी तुझ्यावर अवलंबून आहे.
स्तोत्रसंहिता 16 : 2 (MRV)
मी परमेश्वराला म्हणालो “परमेश्वरा, तू माझा प्रभु आहेस माझ्याकडे असलेली प्रत्येक चांगली गोष्ट मला तुझ्याकडून मिळाली आहे”
स्तोत्रसंहिता 16 : 3 (MRV)
परमेश्वर त्याच्या पृथ्वीवरील भक्तांसाठी अनेक अद्भुत गोष्टी करतो. परमेश्वर त्या लोकांवर खरोखरच प्रेम करतो हे तो दाखवतो.
स्तोत्रसंहिता 16 : 4 (MRV)
परंतु जे लोक उपासनेसाठी दुसऱ्या देवाकडे वळतात त्यांना दु:ख भोगावे लागते. ते त्या मूर्तीना रक्ताची भेट देतात. मी त्यात सहभागी होणार नाही. मी त्या मूर्तींची नावेसुध्दा घेणार नाही.
स्तोत्रसंहिता 16 : 5 (MRV)
माझा वाटा आणि प्याला परमेश्वराकडूनच येतो. परमेश्वरा, तू माझा सांभाळ करतोस तुच मला माझा वाटा देतोस.
स्तोत्रसंहिता 16 : 6 (MRV)
माझा वाटा फारच अद्भूत आहे माझे वतन सुंदर आहे.
स्तोत्रसंहिता 16 : 7 (MRV)
मी परमेश्वराची स्तुती करतो कारण त्याने मला चांगले शिकवले रात्रीच्या वेळी मला अगदी आतल्या गाभ्यातून आज्ञा मिळाल्या.
स्तोत्रसंहिता 16 : 8 (MRV)
मी परमेश्वराला नेहमी माझ्या पुढे ठेवतो आणि मी त्याची उजवी बाजू कधीही सोडणार नाही.
स्तोत्रसंहिता 16 : 9 (MRV)
त्यामुळे माझे ह्दय आणि माझा आत्मा आनंदीत राहील माझे शरीरही सुरक्षित असेल.
स्तोत्रसंहिता 16 : 10 (MRV)
का? कारण परमेश्वरा, तू माझ्या आत्म्याला मृत्युलोकात राहू देणार नाहीस. तुझ्याशी इमानदार असणाऱ्याला तू थडग्यात सडू देणार नाहीस.
स्तोत्रसंहिता 16 : 11 (MRV)
तू मला नीट कसे जगावे ते शिकवशील परमेश्वरा, केवळ तुझ्या सान्निध्यात असणेही संपूर्ण समाधान देणारे असेल. तुझ्या उजव्या बाजूला राहण्याने कायमचे समाधान लाभेल.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11