स्तोत्रसंहिता 23 : 1 (MRV)
परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला ज्याचीगरज आहे ते मला नेहमी मिळत राहील.
स्तोत्रसंहिता 23 : 2 (MRV)
तो मला हिरव्या कुरणात झोपू देतो. तो मला संथ पाण्याजवळ नेतो.
स्तोत्रसंहिता 23 : 3 (MRV)
तो त्याच्या नावाच्या भल्यासाठी माझ्या आत्म्याला नवी शक्ती देतो. तो खरोखरच चांगला आहे हे दाखवण्यासाठी तो मला, चांगुलपणाच्या मार्गाने नेतो.
स्तोत्रसंहिता 23 : 4 (MRV)
मी जरी थडग्यासारख्याभयाण अंधकाराने भरलेल्या दरीतून गेलो तरी मला कसल्याही संकटाचे भय वाटणार नाही का? कारण परमेश्वरा, तू माझ्याबरोबर आहेस. तुझी काठी आणि आकडी माझे सांत्वन करतात.
स्तोत्रसंहिता 23 : 5 (MRV)
परमेश्वरा, तू माझे ताट माझ्या शंत्रूसमोर त्यार केलेस तू माझ्या डोक्यावर तेल घातलेस माझा प्याला आता भरुन वाहू लागला आहे.
स्तोत्रसंहिता 23 : 6 (MRV)
माझ्या उरलेल्या आयुष्यात चांगुलपणा आणि दया सदैव माझ्या बरोबर असतील. आणि मी परमेश्वराच्या मंदिरात अनंतकाळापर्यंत बसेन.

1 2 3 4 5 6

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: