स्तोत्रसंहिता 24 : 1 (MRV)
1 पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे. जग आणि जगातील सर्व लोक परमेश्वराचे आहेत.
स्तोत्रसंहिता 24 : 2 (MRV)
2 परमेश्वराने पाण्यावर पृथ्वी निर्माण केली. ती त्याने नद्यांवर निर्माण केली.
स्तोत्रसंहिता 24 : 3 (MRV)
3 परमेश्वराच्या डोंगरापर्यंत कोण जाऊ शकेल? परमेश्वराच्या पवित्र मंदिरात कोण उभा राहू शकतो?
स्तोत्रसंहिता 24 : 4 (MRV)
4 तिथे कोण उपासना करु शकतो? ज्या लोकांनी वाईट कृत्ये केली नाहीत, ज्यांचे ह्दय शुध्द आहे, ज्यांनी माझ्या नावाचा उपयोग असत्य सत्य वाटावे यासाठी केला नाही आणि जे खोटे बोलले नाहीत व ज्यांनी खोटी आश्वासने दिली नाहीत असेच लोक तिथे आराधना करु शकतील.
स्तोत्रसंहिता 24 : 5 (MRV)
5 चांगले लोक इतरांना आशीर्वाद देण्यासाठी परमेश्वराला विनंती करतात. ते चांगले लोक देवाकडे, त्यांच्या त्रात्याकडे चांगुलपणाची मागणी करतात.
स्तोत्रसंहिता 24 : 6 (MRV)
6 ते चांगले लोक देवाचा मार्ग अवलंबतात. ते याकोबाच्या देवाकडे मदतीसाठी जातात.
स्तोत्रसंहिता 24 : 7 (MRV)
7 वेशींनो, आपले मस्तक उंच करा. जुन्या दरवाजांनो, उघडा म्हणजे तो गौरवशाली राजा आत येईल.
स्तोत्रसंहिता 24 : 8 (MRV)
8 तो गौरशाली राजा कोण आहे? परमेश्वरच तो राजा आहे. तोच बलवान सैनिक आहे परमेश्वरच तो राजा आहे, तोच युध्दातला नायक आहे.
स्तोत्रसंहिता 24 : 9 (MRV)
9 वेशींनो, तुमची मस्तके उंच करा. प्राचीन दरवाजांनो, उघडा म्हणजे तो गौरवशाली राजा आत येईल.
स्तोत्रसंहिता 24 : 10 (MRV)
10 तो गौरवशाली राजा कोण आहे? सर्वशक्तिमान परमेश्वरच तो राजा आहे तोच तो गौरवशाली राजा आहे.

1 2 3 4 5 6 7 8 9 10

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: