स्तोत्रसंहिता 25 : 1 (MRV)
परमेश्वरा, मी स्वतला तुझ्याकडे सुपूर्द करतो.
स्तोत्रसंहिता 25 : 2 (MRV)
देवा, माझा तुझ्यावर विश्वास आहे आणि माझी निराशा होणार नाही. माझे शत्रू मला हसणार नाहीत.
स्तोत्रसंहिता 25 : 3 (MRV)
एखाद्याने तुझ्यावर विश्वास टाकला तर त्याची निराशा होणार नाही परंतु दगाबाज मात्र निराश होतील. त्यांना काहीही मिळणार नाही.
स्तोत्रसंहिता 25 : 4 (MRV)
परमेश्वरा तुझे मार्ग आत्मसात करण्यासाठी मला मदत कर. मला तुझे मार्ग शिकव.
स्तोत्रसंहिता 25 : 5 (MRV)
मला मार्ग दाखव आणि मला तुझे सत्य शिकव तू माझा देव आहेस, माझा तारणारा आहेस मी रोज तुझ्यावर विश्वास टाकतो.
स्तोत्रसंहिता 25 : 6 (MRV)
परमेश्वरा, माझ्याशी दयाळू राहायचे लक्षात असू दे तुझ्याजवळचे नेहमीचे कोवळे प्रेम मला दाखव.
स्तोत्रसंहिता 25 : 7 (MRV)
माझे पाप आणि तरुणपणी मी ज्या वाईट गोष्टीकेल्या त्या लक्षात ठेवू नकोस परमेश्वरा, तुझ्या चांगल्या कीर्तीसाठी माझी प्रेमाने आठण ठेव.
स्तोत्रसंहिता 25 : 8 (MRV)
परमेश्वर खरोखरच चांगला आहे. तो पापी माणसांना जगण्यासाठी योग्यमार्ग दाखवतो.
स्तोत्रसंहिता 25 : 9 (MRV)
तो दीन माणसांना त्यांचे मार्ग दाखवतो तो त्यांचे न्यायीपणाने नेतृत्व करतो.
स्तोत्रसंहिता 25 : 10 (MRV)
जे लोक परमेश्वराचे करार आणि वचने पाळतात त्यांच्याशी तो सच्चा आणि दयाळू असतो.
स्तोत्रसंहिता 25 : 11 (MRV)
परमेश्वरा, मी अनेक चुकीच्या गोष्टी केल्या. परंतु तुझा चांगुलपणा दाखवण्यासाठी तू मला त्याबद्दल क्षमा केलीस.
स्तोत्रसंहिता 25 : 12 (MRV)
जर एखाद्याने परमेश्वराच्या मार्गाने जायचे ठरवले तर देव त्याला उत्तम रीतीने कसे जगायचे ते दाखवील.
स्तोत्रसंहिता 25 : 13 (MRV)
तो माणूस चांगल्या गोष्टींचे सुख उपभोगील आणि त्याची मुले देवाने त्याला जी जमीन द्यायचे वचन दिले होते त्या जमिनीचे मालक बनतील.
स्तोत्रसंहिता 25 : 14 (MRV)
परमेश्वर त्याचे रहस्य त्याच्या भक्तांना सांगतो. तो त्याच्या भक्तांना त्याचे करार शिकवतो.
स्तोत्रसंहिता 25 : 15 (MRV)
मी नेहमी परमेश्वराकडे मदतीसाठी दृष्टी वळवतो. तो नेहमी माझी संकटातून मुक्तता करतो.
स्तोत्रसंहिता 25 : 16 (MRV)
परमेश्वरा, मी दु:खा एकाकी आहे. माझ्याकडे वळ व मला दया दाखव.
स्तोत्रसंहिता 25 : 17 (MRV)
माझी माझ्या संकटांतून मुक्तता कर. माझ्या समस्या सोडवण्यासाठी मला मदत कर.
स्तोत्रसंहिता 25 : 18 (MRV)
परमेश्वरा, माझ्या यातांनकडे व संकटांकडे पाहा. मला माझ्या सर्व पापांबद्दल क्षमा कर.
स्तोत्रसंहिता 25 : 19 (MRV)
माझ्या सर्व शत्रूंकडे नजर टाक. ते माझा तिरस्कार करतात व मला दुख देतात.
स्तोत्रसंहिता 25 : 20 (MRV)
देवा, माझे रक्षण कर आणि मला वाचव. माझा तुझ्यावर विश्वास आहे, तेव्हा माझी निराशा करु नकोस.
स्तोत्रसंहिता 25 : 21 (MRV)
देवा तू खरोखरच चांगला आहेस. माझा तुझ्यावर विश्वास आहे म्हणून तू माझे रक्षण कर.
स्तोत्रसंहिता 25 : 22 (MRV)
देवा, इस्राएलाच्या लोकांचे त्यांच्या सर्व शत्रूंपासून रक्षण कर.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22