स्तोत्रसंहिता 26 : 1 (MRV)
परमेश्वरा, माझा न्याय कर. मी सच्चे आयुष्य जगलो हे सिध्द कर. मी परमेश्वरावर विश्वास ठेवणे कधीही सोडले नाही.
स्तोत्रसंहिता 26 : 2 (MRV)
परमेश्वरा, माझी चौकशी कर माझी परीक्षा घे. माझ्या ह्दयात आणि मनात अगदी जवळून पाहा.
स्तोत्रसंहिता 26 : 3 (MRV)
मी नेहमीच तुझे कोवळे प्रेम बघतो. मी तुझ्या सत्याच्या आधाराने जगतो.
स्तोत्रसंहिता 26 : 4 (MRV)
मी कपटी लोकांबरोबर जात नाही, मी ढोंगी लोकांची कधीही संगत धरीत नाही.
स्तोत्रसंहिता 26 : 5 (MRV)
मी त्या दुष्टांच्या टोळीचा तिरस्कार करतो. मी त्या दुष्टांच्या टोळीत कधीही सामील होणार नाही.
स्तोत्रसंहिता 26 : 6 (MRV)
परमेश्वरा, मी हात स्वच्छ धुवून तुझ्या वेदीजवळ आलो आहे.
स्तोत्रसंहिता 26 : 7 (MRV)
परमेश्वरा, मी तुझे स्तुतीपर गाणे गातो तू ज्या ज्या आश्चर्यकारक गोष्टी केल्या आहे सत्यांची गाणी मी गातो.
स्तोत्रसंहिता 26 : 8 (MRV)
परमेश्वरा, मला तुझे मंदिर आवडते. मला तुझा तेजस्वी तंबू आवडतो.
स्तोत्रसंहिता 26 : 9 (MRV)
परमेश्वरा, मला पाप्यांच्या यादीत बसवू नकोस. त्या खुन्यांबरोबर मला मारु नकोस.
स्तोत्रसंहिता 26 : 10 (MRV)
ते लोक इतरांना फसवतील. वाईट गोष्टी करण्यासाठी ते पैसाही घेतील.
स्तोत्रसंहिता 26 : 11 (MRV)
परंतु मी निरपराध आहे. म्हणून देवा माझ्यावर दया करआणि मला वाचव.
स्तोत्रसंहिता 26 : 12 (MRV)
मी सर्व धोक्यांपासून सुरक्षित आहे. परमेश्वरा, तुझे भक्त भेटतात तेव्हा मी तुझी स्तुती करतो.
❮
❯