स्तोत्रसंहिता 33 : 1 (MRV)
चांगले लोकहो! परमेश्वरापाशी आंनद व्यक्त करा. न्यायी लोकांनो त्याची स्तुती करा.
स्तोत्रसंहिता 33 : 2 (MRV)
वीणा वाजवून परमेश्वराचे स्तवन करा. दहा तारांच्या वीणेवर परमेश्वराचे गुणगान गा.
स्तोत्रसंहिता 33 : 3 (MRV)
त्याच्यासाठी नवे गाणे गा. आनंदीहून चांगल्या रीतीने वाजवा.
स्तोत्रसंहिता 33 : 4 (MRV)
देवाचा शब्द खरा असतो तो जे काही करतो त्यावर तुम्ही विसंबून राहू शकता.
स्तोत्रसंहिता 33 : 5 (MRV)
देवाला चांगलुपणा आणि न्यायीवृत्ती आवडते. परमेश्वराने पृथ्वी त्याच्या प्रेमाने भरुन टाकली.
स्तोत्रसंहिता 33 : 6 (MRV)
परमेश्वराने आज्ञा केली आणि जगाची निर्मिती झाली देवाच्या तोंडातल्या श्वासाने पृथ्वीवरील सर्व गोष्टी निर्माण झाल्या.
स्तोत्रसंहिता 33 : 7 (MRV)
देवाने समुद्रातील पाणी एका ठिकाणी आणले. तो समुद्राला त्याच्या जागेवर ठेवतो.
स्तोत्रसंहिता 33 : 8 (MRV)
पृथ्वीवरील प्रत्येकाने परमेश्वराची भीती बाळगली पाहिजे आणि त्याला मान दिला पाहिजे या जगात राहणाऱ्या प्रत्येकाने त्याला भ्यायला पाहिजे.
स्तोत्रसंहिता 33 : 9 (MRV)
का? देव फक्त आज्ञा करतो आणि त्याप्रमाणे गोष्टी घडतात. आणि त्याने जर “थांब” म्हटले तर ती गोष्ट थांबते.
स्तोत्रसंहिता 33 : 10 (MRV)
राष्ट्रांचा उपदेश कवडी मोलाचा आहे तो त्यांच्या सगळ्या योजनांचा नाश करु शकतो.
स्तोत्रसंहिता 33 : 11 (MRV)
परंतु परमेश्वराचा उपदेश सदैव चांगला असतो त्याच्या योजना पिढ्यान्पिढ्या चांगल्या असतात.
स्तोत्रसंहिता 33 : 12 (MRV)
ज्या लोकांचा देव परमेश्वर आहे ते लोक सुखी आहेत. देवाने त्यांची विशेष माणसं म्हणून निवड केली.
स्तोत्रसंहिता 33 : 13 (MRV)
परमेश्वराने स्वर्गातून खाली पाहिले. त्याला सर्व लोक दिसले.
स्तोत्रसंहिता 33 : 14 (MRV)
त्याने त्याच्या सिंहासनावरुन पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांकडे पाहिले.
स्तोत्रसंहिता 33 : 15 (MRV)
देवाने प्रत्येकाचे मन निर्माण केले. प्रत्येक जण काय विचार करतो ते देवाला माहीत असते.
स्तोत्रसंहिता 33 : 16 (MRV)
राजा त्याच्या स्व:तच्या सामर्थ्याने सुरक्षित राहू शकत नाही. शूर सैनिक त्याच्या स्व:तच्या शक्तीमुळे सुरक्षित राहू शकत नाही.
स्तोत्रसंहिता 33 : 17 (MRV)
घोडे युध्दात विजय मिळवू शकत नाहीत. त्यांची शक्ती तुम्हाला पळून जायला मदत करु शकत नाही.
स्तोत्रसंहिता 33 : 18 (MRV)
परमेश्वर त्याच्या भक्तांवर नजर ठेवतो आणि त्यांची काळजी घेतो. जे लोक त्याची भक्ती करतात त्यांचे तो रक्षण करतो.
स्तोत्रसंहिता 33 : 19 (MRV)
देव त्यांना मरणापासून वाचवतो ते भुकेले असतील तेव्हा त्यांना तो शक्ती देतो.
स्तोत्रसंहिता 33 : 20 (MRV)
म्हणून आपण परमेश्वरासाठी थांबू. तो आपली मदत आणि ढाल आहे.
स्तोत्रसंहिता 33 : 21 (MRV)
देव आपल्याला आनंदी करतो. आम्ही त्याच्या पवित्र नावावर खरोखरच विश्वास ठेवतो.
स्तोत्रसंहिता 33 : 22 (MRV)
परमेश्वरा, आम्ही मनापासून तुझी उपासना करतो म्हणून तू तुझे महान प्रेम आम्हाला दाखव.
❮
❯