स्तोत्रसंहिता 34 : 1 (MRV)
मी परमेश्वराला नेहमी धन्यवाद देईन. माझ्या ओठांवर नेहमी त्याची स्तुती असेल.
स्तोत्रसंहिता 34 : 2 (MRV)
विनम्र लोकांनो ऐका आणि आनंदी व्हा माझ्या मनाला परमेश्वराचा गर्व वाटतो.
स्तोत्रसंहिता 34 : 3 (MRV)
देवाच्या महानते बद्दल माझ्या बरोबर सांगत चला. आपण त्याच्या नावाला प्रतिष्ठा देऊ या.
स्तोत्रसंहिता 34 : 4 (MRV)
मी देवाकडे मदतीसाठी गेलो आणि त्याने माझे ऐकले. मला ज्या सर्व गोष्टींची भीती वाटत होती त्यापासून त्याने मला वाचवले.
स्तोत्रसंहिता 34 : 5 (MRV)
देवाकडे मदतीसाठी वळा तुमचा स्वीकार होईल लाज वाटून घेऊ नका.
स्तोत्रसंहिता 34 : 6 (MRV)
या गरीब माणसाने परमेश्वराकडे मदत मागितली आणि परमेश्वराने माझे ऐकले. त्याने माझी सर्व संकटांतून मुक्तता केली.
स्तोत्रसंहिता 34 : 7 (MRV)
परमेश्वराचा दूत त्याच्या भक्तांभोवती छावणी बांधतो. परमेश्वराचा दूत त्यांचे रक्षण करतो व त्यांना संकट मुक्त करतो.
स्तोत्रसंहिता 34 : 8 (MRV)
परमेश्वराचा अनुभव घ्या आणि तो किती चांगला आहे ते शिका जो परमेश्वरावर अवलंबून असतो तो खरोखरच सुखी होईल.
स्तोत्रसंहिता 34 : 9 (MRV)
परमेश्वराच्या पवित्र लोकांनी त्याची भक्ती केली पाहिजे. परमेश्वराच्या भक्तांसाठी सुराक्षित अशी दुसरी जागा नाही.
स्तोत्रसंहिता 34 : 10 (MRV)
शक्तिशाली माणसे दुबळी आणि भुकेली बनतील. परंतु जे लोक देवाकडे मदतीसाठी जातात त्यांना चांगल्या गोष्टी मिळतील.
स्तोत्रसंहिता 34 : 11 (MRV)
मुलांनो माझे ऐका आणि मी तुम्हाला परमेश्वराला कसा मान द्यायचा ते शिकवीन.
स्तोत्रसंहिता 34 : 12 (MRV)
जर एखाद्याचे जीवनावर प्रेम असेल आणि त्याला जर खूप आणि चांगले जगायचे असेल तर,
स्तोत्रसंहिता 34 : 13 (MRV)
त्याने वाईट गोष्टी बोलायला नकोत. त्याने खोटे बोलायला नको.
स्तोत्रसंहिता 34 : 14 (MRV)
वाईट कृत्ये करणे सोडून द्या. चांगली कृत्ये करा. शांतीसाठी काम करा. शांती मिळे पर्यंत तिच्या मागे धावा.
स्तोत्रसंहिता 34 : 15 (MRV)
परमेश्वर चांगल्या लोकांचे रक्षण करतो. तो त्यांची प्रार्थना ऐकतो.
स्तोत्रसंहिता 34 : 16 (MRV)
परंतु परमेश्वर वाईट कृत्ये करणाऱ्या लोकांच्या विरुध्द आहे. तो त्यांचा सर्वनाश करतो.
स्तोत्रसंहिता 34 : 17 (MRV)
परमेश्वराची प्रार्थना करा, तो तुमचे ऐकेल. तो तुम्हाला तुमच्या सर्व संकटांतून वाचवेल.
स्तोत्रसंहिता 34 : 18 (MRV)
काही लोकांवर खूप संकटे येतात आणि ते गर्व करायचे थांबवतात. परमेश्वर अशा लोकांच्या जवळ असतो. तो त्या विनम्र लोकांचे रक्षण करतो.
स्तोत्रसंहिता 34 : 19 (MRV)
चांगल्या लोकांच्या मागे अनेक संकटे येतील. परंतु परमेश्वर त्यांना प्रत्येक संकटातून वाचवतो.
स्तोत्रसंहिता 34 : 20 (MRV)
परमेश्वर त्याच्या सर्व हाडाचे रक्षण करेल. त्यांचे एकही हाड तो मोडू देणार नाही.
स्तोत्रसंहिता 34 : 21 (MRV)
परंतु संकटे वाईट माणसांना मारुन टाकतील चांगल्या माणसांच्या सगळ्या शत्रूंचा नाश होईल.
स्तोत्रसंहिता 34 : 22 (MRV)
परमेश्वर त्याच्या सेवकांच्या आत्म्यांना वाचवतो. ते लोक त्याच्यावर अवलंबून असतात तो त्यांचा विनाश होऊ देणार नाही.
❮
❯