स्तोत्रसंहिता 4 : 1 (MRV)
माझ्या चांगल्या देवा, मी तुझी प्रार्थना करीन तेव्हा मला उत्तर दे माझी प्रार्थना ऐक आणि माझ्याशी दयाळू अंतकरणाने वाग. मला माझ्या संकटांपासून थोडी तरी मुक्ती दे.
स्तोत्रसंहिता 4 : 2 (MRV)
लोकहो! तुम्ही आणखी किती काळ माझ्याविषयी वाईट बोलत राहाणार आहात? तुम्ही माझ्याबाद्दल सांगण्यासाठी नवीन काहीतरी खोटे नाटे शोधत असता आणि माझ्याविषयी तसले खोटे सांगणे तुम्हाला आवडते.
स्तोत्रसंहिता 4 : 3 (MRV)
परमेश्वर आपल्या चांगल्या माणसांचे ऐकतो हे तुम्हाला माहीत आहे म्हणून मी जेव्हा जेव्हा त्याची प्रार्थना करतो तेव्हा तेव्हा तो माझे एकतो.
स्तोत्रसंहिता 4 : 4 (MRV)
जर तुम्हाला कसला त्रास होत असेल तर तुम्ही रागवा, पण पाप करू नका. तुम्ही झोपायच्यावेळी त्या गोष्टीचा विचार करा आणि शांत पडून राहा.
स्तोत्रसंहिता 4 : 5 (MRV)
देवाला चांगल्या गोष्टीचे होमार्पण करा आणि परमेश्वरावर विश्वास ठेवा.
स्तोत्रसंहिता 4 : 6 (MRV)
बरेच लोक म्हणतात “आम्हाला देवाचा चांगुलपणा कोण दाखवेल? परमेश्वरा, आम्हाला तुझे तेजस्वी मुख पाहू दे.”
स्तोत्रसंहिता 4 : 7 (MRV)
परमेश्वरा, तू मला खूप सुखी केलेस. सुगीच्या दिवसात जेव्हा धनधान्याची आणि द्राक्षारसाची समृध्दी असते तेव्हा मला जितका आनंद होतो त्यापेक्षा मी आता अधिक आनंदी आहे.
स्तोत्रसंहिता 4 : 8 (MRV)
मी अंथरुणावर पडतो आणि अगदी समाधानात झोपतो का? कारण परमेश्वरा, तू मला सुरक्षित ठेवून झोपवतोस.
❮
❯