स्तोत्रसंहिता 47 : 1 (MRV)
लोकहो! तुम्ही टाळ्या वाजवा. तुम्ही सर्व लोक देवाशी आनंदाने जल्लोष करा.
स्तोत्रसंहिता 47 : 2 (MRV)
सर्वशक्तिमान परमेश्वर भीतिदायक आहे. तो सर्व पृथ्वीवरील महान राजा आहे.
स्तोत्रसंहिता 47 : 3 (MRV)
त्याने आपल्याला दुसऱ्या लोकांचा पराभव करायला मदत केली. त्याने ते देश आपल्या अधिपत्याखाली आणले.
स्तोत्रसंहिता 47 : 4 (MRV)
देवाने आपल्यासाठी आपल्या प्रदेशाची निवड केली. त्याने त्याला आवडणाऱ्या याकोबासाठी हा अद्भुत रम्य देश निवडला.
स्तोत्रसंहिता 47 : 5 (MRV)
परमेश्वर बिगुलाच्या आणि तुतारीच्या आवाजात आपल्या सिंहासानाकडे जातो.
स्तोत्रसंहिता 47 : 6 (MRV)
देवाचे गुणगान करा. आपल्या राजाची स्तुतिपर गाणी गा.
स्तोत्रसंहिता 47 : 7 (MRV)
देव सर्व जगाचा राजा आहे. त्याच्या स्तुतिपर गाणे गा.
स्तोत्रसंहिता 47 : 8 (MRV)
देव त्याच्या पवित्र सिंहासनावर बसतो. तो सगळ्या देशांवर राज्य करतो.
स्तोत्रसंहिता 47 : 9 (MRV)
देशांचे प्रमुख अब्राहामाच्या देवाच्या लोकांना भेटतात. सर्व देशांचे प्रमुख देवाचे आहेत. देव त्या सगळ्यां पेक्षा थोर आहे.

1 2 3 4 5 6 7 8 9

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: