स्तोत्रसंहिता 48 : 1 (MRV)
1 परमेश्वर थोर आहे आपल्या देवाच्या शहरात, त्याच्या पवित्र पर्वतावर लोक त्याची स्तुति करतात.
स्तोत्रसंहिता 48 : 2 (MRV)
2 देवाचे पवित्र शहर सुंदर आहे. त्याचे सौंदर्य सर्व पृथ्वीवर आनंद आणते सियोन पर्वत सगळ्यात उंच आणि पवित्र पर्वत आहे. हे त्या महान राजाचे शहर आहे.
स्तोत्रसंहिता 48 : 3 (MRV)
3 इथे त्या शहराच्या राजवाड्यांत देवाला किल्ला म्हणतात.
स्तोत्रसंहिता 48 : 4 (MRV)
4 एकदा काही राजे भेटले. त्यांनी या शहरावर हल्ला करायची योजना आखली ते सगळे चालून आले.
स्तोत्रसंहिता 48 : 5 (MRV)
5 त्यांनी पाहिले आणि ते विस्मित झाले. ते घाबरले आणि पळत सुटले.
स्तोत्रसंहिता 48 : 6 (MRV)
6 भयाने त्यांना घेरले, भीतीने त्यांचा यरकाप झाला.
स्तोत्रसंहिता 48 : 7 (MRV)
7 देवा, तू पूर्वेकडच्या जोरदार वाऱ्याचा उपयोग केलास आणि त्यांची मोठी जहाजे मोडलीस.
स्तोत्रसंहिता 48 : 8 (MRV)
8 होय, आम्ही ती गोष्ट ऐकली पण आम्ही ते सर्वशक्तिमान परमेश्वराच्या शहरात, आमच्या देवाच्या शहरात घडत असलेले पाहिले. देव ते शहर सदैव सामर्थ्यवान बनवतो.
स्तोत्रसंहिता 48 : 9 (MRV)
9 देवा, आम्ही तुझ्या मंदिरात तुझ्या प्रेमळ दयेचा लक्षपूर्वक विचार करतो.
स्तोत्रसंहिता 48 : 10 (MRV)
10 देवा तू प्रसिध्द आहेस. पृथ्वीवर सगळीकडे लोक तुझी स्तुती करतात तू किती चांगला आहेस ते प्रत्येकाला माहीत आहे.
स्तोत्रसंहिता 48 : 11 (MRV)
11 देवा, सियोन पर्वत आनंदी आहे यहूदाची शहरे तुझ्या चांगल्या निर्णयामुळे उल्हासित झाली आहेत.
स्तोत्रसंहिता 48 : 12 (MRV)
12 सियोन भोवती फिरा, शहर बघा, बुरुज मोजा.
स्तोत्रसंहिता 48 : 13 (MRV)
13 उंच भिंती बघा, सियोनच्या राजवा्याचे कौतुक करा. नंतर तुम्ही पुढच्या पिढीला त्याबद्दल सांगू शकाल.
स्तोत्रसंहिता 48 : 14 (MRV)
14 देव खरोखरच नेहमी आपला देव असेल. तो आपल्याला सदैव मार्गदर्शन करेल.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: