स्तोत्रसंहिता 49 : 1 (MRV)
सर्व राष्ट्रांनो, हे ऐका. पृथ्वीवरील सर्व जनहो! हे ऐका.
स्तोत्रसंहिता 49 : 2 (MRV)
प्रत्येकाने, गरीब असो वा श्रीमंत, हे ऐकले पाहिजे.
स्तोत्रसंहिता 49 : 3 (MRV)
मी तुम्हाला काही शहाणपणाच्या आणि हुशारीच्या गोष्टी सांगणार आहे.
स्तोत्रसंहिता 49 : 4 (MRV)
मी त्या गोष्टी ऐकल्या आणि आता माझ्या वीणेच्या साथीवर मी त्या तुम्हाला गाऊन दाखवतो.
स्तोत्रसंहिता 49 : 5 (MRV)
संकटे आली तर मला भीती का वाटावी? दुष्टांनी मला घेरले आणि सापळ्यात अडकवले तर मी का घाबरु?
स्तोत्रसंहिता 49 : 6 (MRV)
काही लोकांना वाटते की त्यांची सत्ता आणि संपत्ती त्यांचे रक्षण करील परंतु ते लोक मूर्ख आहेत.
स्तोत्रसंहिता 49 : 7 (MRV)
कुणीही मानवी मित्र तुम्हाला वाचवू शकणार नाही आणि तुम्ही देवाला लाच देऊ शकत नाही.
स्तोत्रसंहिता 49 : 8 (MRV)
स्व:तचे आयुष्य कायमचे विकत घेण्याइतका पैसा कुणाकडेच नसतो. सदैव जिवंत राहाण्याचा हक् विकत घेण्याइतका.
स्तोत्रसंहिता 49 : 9 (MRV)
पैसा कुणाकडेच नसतो व शरीर थडग्यात कुजू नये म्हणून ते वाचविण्यासाठी ही कुणाकडे पैसे नसतात.
स्तोत्रसंहिता 49 : 10 (MRV)
शहाणी माणसेही मूर्ख लोकांसारखीच मरतात. आणि इतर लोक त्यांची सर्व संपत्ती घेतात.
स्तोत्रसंहिता 49 : 11 (MRV)
थडगे हेच सर्वांचे सर्वकाळचे नवीन घर असते. आणि त्यांच्याकडे किती जमीन आहे यामुळे त्यात काहीही फरक पडत नाही.
स्तोत्रसंहिता 49 : 12 (MRV)
श्रीमंत लोक सर्वकाळ जगू शकत नाहीत. ते प्राण्यासारखेच मरतात.
स्तोत्रसंहिता 49 : 13 (MRV)
आपल्या संपत्तीवर भरवसा ठेवणाऱ्या अशामूर्ख लोकांचे असेच होते.
स्तोत्रसंहिता 49 : 14 (MRV)
ते लोक मेंढ्यांप्रमाणे आहेत. थडगे त्यांची लेखणी आहे. मरण त्यांचा मेंढपाळ आहे. एका सकाळी त्यांच्या शरीराचा थडग्यात नाश होईल आणि ते कुजेल तेव्हा चांगले लोक आनंद करतील.
स्तोत्रसंहिता 49 : 15 (MRV)
परंतु देव किंमत चुकवून माझा जीव वाचवेल. तो मला थडग्याच्या सामर्थ्यापासून वाचवेल.
स्तोत्रसंहिता 49 : 16 (MRV)
लोक केवळ श्रीमंत आहेत म्हणून त्यांची भीती बाळगू नकोस. लोकांकडे मोठी, वैभवशाली घरे आहेत म्हणून त्यांची भीती बाळगू नकोस.
स्तोत्रसंहिता 49 : 17 (MRV)
ते लोक मरतील तेव्हा एकही गोष्ट बरोबर घेऊन जाणार नाहीत. या सुंदर वस्तूपैकी एकही वस्तू ते बरोबर नेणार नाहीत.
स्तोत्रसंहिता 49 : 18 (MRV)
आपल्या जीवनात आपण किती चांगल्या गोष्टी केल्या आहेत ह्याविषयी एखादी श्रीमंत व्यक्ति स्व:तचेच अभिनंदन करील व लोकही त्याची स्तुति करतील.
स्तोत्रसंहिता 49 : 19 (MRV)
परंतु त्याला त्याच्या पूर्वजांकडे जाण्याची वेळ येईलच आणि नंतर तो दिवसाचा प्रकाश पुन्हा बघू शकणार नाही.
स्तोत्रसंहिता 49 : 20 (MRV)
लोक श्रीमंत असूनही समजू शकणार नाहीत. ते प्राण्यांप्रमणेच मरण पावतील.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: