स्तोत्रसंहिता 51 : 1 (MRV)
देवा, माझ्यावर दया कर, तुझ्या अतिशय प्रेमळ दयाळूपणाने आणि तुझ्या कृपेने माझी पापे पुसून टाक.
स्तोत्रसंहिता 51 : 2 (MRV)
देव माझे अपराधीपण खरवडून घालवून टाक. माझी पापे धुऊन टाक, मला पुन्हा स्वच्छ कर.
स्तोत्रसंहिता 51 : 3 (MRV)
मी पाप केले हे मला माहीत आहे. ती पापे मला नेहमी दिसतात.
स्तोत्रसंहिता 51 : 4 (MRV)
तू ज्या गोष्टी चुकीच्या आहेत असे सांगतोस त्याच मी केल्या. देवा मी तुझ्याविरुध्द पाप केले. मी त्या पापांची कबुली देतो म्हणजे लोकांना कळेल की मी चुकलो आणि तू बरोबर होतास. तुझे निर्णय योग्य आहेत.
स्तोत्रसंहिता 51 : 5 (MRV)
मी पापातच जन्मलो आणि पापातच माझ्या आईने माझा गर्भ धारण केला.
स्तोत्रसंहिता 51 : 6 (MRV)
देवा, मी खरोखरच प्रामणिक व्हावे असे वाटत असेल तर शहाणपण माझ्या आत खोलवर ठेव.
स्तोत्रसंहिता 51 : 7 (MRV)
मला शुध्द करण्यासाठी तू एजोब वनस्पती वापर आणि विधी कर. मला आंघोळ घाल म्हणजे मी बफर्पोक्षा शुभ्र होईन.
स्तोत्रसंहिता 51 : 8 (MRV)
मला सुखी कर, पुन्हा आनंदी कसे व्हायचे ते मला सांग. तू जी हाडे चिरडून टाकलीस ती पुन्हा आनंदी होऊ दे.
स्तोत्रसंहिता 51 : 9 (MRV)
माझ्या पापांकडे बघू नकोस, ती पुसून टाक.
स्तोत्रसंहिता 51 : 10 (MRV)
देवा माझ्यात पवित्र ह्दय निर्माण कर. माझा आत्मा पुन्हा बलशाली कर.
स्तोत्रसंहिता 51 : 11 (MRV)
मला दूर लोटू नकोस आणि तुझा पवित्र आत्मा माझ्यातून काढून घेऊ नकोस.
स्तोत्रसंहिता 51 : 12 (MRV)
मी तुझ्या मदतीमुळे आनंदी झालो, मला पुन्हा तुझा आनंद दे, माझा आत्मा सबळ कर आणि तुझ्या आज्ञा पाळणारा कर.
स्तोत्रसंहिता 51 : 13 (MRV)
पापी लोकांनी कसे राहावे अशी तुझी इच्छा आहे त्याप्रमाणे मी त्यांना शिकवीन. आणि ते तुझ्याकडे परत येतील देवा, मला खुनी समजू नकोस.
स्तोत्रसंहिता 51 : 14 (MRV)
देवा, तूच माझा त्राता आहेस. तू किती चांगला आहेस ते सांगणारे गाणे मला गाऊ दे.
स्तोत्रसंहिता 51 : 15 (MRV)
प्रभु, मी माझे तोंड उघडीन आणि तुझे गुणगान करीन.
स्तोत्रसंहिता 51 : 16 (MRV)
तुला बळी नको आहेत. तुला नको असणारे बळी मी देणार नाही.
स्तोत्रसंहिता 51 : 17 (MRV)
देवाला हवी असलेला बळी म्हणजे विदीर्ण झालेला आत्मा होय. देवा, तू चिरडले गेलेल्या आणि विदीर्ण झालेल्या ह्दयाकडे पाठ फिरवणार नाहीस.
स्तोत्रसंहिता 51 : 18 (MRV)
देवा, तू सियोनाशी चांगला आणि दयाळू राहा.यरुशलेमच्या भिंती बांध.
स्तोत्रसंहिता 51 : 19 (MRV)
नंतर तू चांगले बळी उपभोगू शकशील आणि होमार्पणे ही तू उपभोगशील. आणि लोक पुन्हा तुझ्या वेदीवर बैलांचा बळी देतील.
❮
❯