स्तोत्रसंहिता 54 : 1 (MRV)
1 देवा, तुझ्या अधिकाराचा उपयोग करुन मला वाचव. तुझे महान सामर्थ्य वापर आणि मला मुक्त कर.
स्तोत्रसंहिता 54 : 2 (MRV)
2 देवा, माझी प्रार्थना ऐक मी काय म्हणतो ते ऐक.
स्तोत्रसंहिता 54 : 3 (MRV)
3 जे देवाची उपासना करत नाहीत असे परके माझ्या विरुध्द गेले आहेत आणि शक्तिशाली लोक मला मारायला निघाले आहेत.
स्तोत्रसंहिता 54 : 4 (MRV)
4 पाहा, माझा देव मला मदत करेल. माझा मालक मला साहाय्य करेल.
स्तोत्रसंहिता 54 : 5 (MRV)
5 जे लोक माझ्याविरुध्द गेले आहेत त्यांना देव शिक्षा करेल. देव माझ्याशी प्रमाणिक असेल आणि तो त्या लोकांचा नाश करेल.
स्तोत्रसंहिता 54 : 6 (MRV)
6 देवा, मी तुला खुशीने अर्पणे देईन. परमेश्वरा, मी तुझ्या चांगल्या नावाची स्तुती करेन.
स्तोत्रसंहिता 54 : 7 (MRV)
7 परंतु मी तुला सर्व संकटांतून सोडवण्याची विनंती करीत आहे. माझ्या शत्रूंचा पराभव झाल्याचे मला पाहू दे.

1 2 3 4 5 6 7

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: