स्तोत्रसंहिता 58 : 1 (MRV)
न्यायाधीशांनो, तुम्ही तुमच्या निर्णयात न्यायी आहात काय? तुम्ही लोकांचा न्यायाने निवाडा करीत आहात काय?
स्तोत्रसंहिता 58 : 2 (MRV)
नाही, तुम्ही फक्त वाईट गोष्टी करण्याचाच विचार करता. तुम्ही या देशात हिंसक कृत्ये करीत आहात.
स्तोत्रसंहिता 58 : 3 (MRV)
त्या वाईट लोकांनी जन्मल्याबरोबर दुष्कर्म करायला सुरुवात केली. ते जन्मापासूनच खोटारडे होते.
स्तोत्रसंहिता 58 : 4 (MRV)
ते सापासारखेच भयंकर आहेत आणि नागाप्रमाणे त्यांना ऐकू येत नाही. ते सत्य ऐकायला नकार देतात.
स्तोत्रसंहिता 58 : 5 (MRV)
नागाला गारुड्याचे संगीत वा गाणे ऐकू येत नाही आणि ती दुष्ट माणसे या सारखी आहेत.
स्तोत्रसंहिता 58 : 6 (MRV)
परमेश्वरा, ती दुष्ट माणसे सिंहासारखी आहेत. म्हणून परमेश्वरा तू त्यांचे दात पाड.
स्तोत्रसंहिता 58 : 7 (MRV)
ते लोक वाहून जाणाऱ्या पाण्याप्रमाणे नाहीसे होवोत. ते रस्त्यातल्या गवताप्रमाणे तुडवले जावोत.
स्तोत्रसंहिता 58 : 8 (MRV)
चालताना विरघळून जाणाऱ्या गोगलगायी प्रमाणे ते विरघळून जावोत. जन्मत मेलेल्या व दिवसाचा प्रकाश न पाहिलेल्या बाळा प्रमाणे त्यांचे होवो.
स्तोत्रसंहिता 58 : 9 (MRV)
भांडे तापविण्यासाठी काट्या पेटवितात. तेव्हा त्यात चटकान् जळणाऱ्या काट्यांप्रमाणे त्यांचे होवो.
स्तोत्रसंहिता 58 : 10 (MRV)
वाईट लोकांनी केलेल्या दुष्कृत्यांबद्दल जर त्यांना शिक्षा झाली तर चांगल्या माणसाला आनंद होईल, तो त्या दुष्टांच्या रक्तात आपले पाय धुवेल.
स्तोत्रसंहिता 58 : 11 (MRV)
असे जेव्हा घडेल तेव्हा लोक म्हणतील “चांगल्या माणसांना त्यांचे फळ मिळाले, जगाला न्याय देण्यासाठी देव खरोखर आहे.”
❮
❯