स्तोत्रसंहिता 60 : 1 (MRV)
देवा, तू आमच्यावर रागावला होतास म्हणून तू आमचा त्याग केलास आणि आमचा नाश केलास. कृपाकरुन आमच्याकडे परत ये.
स्तोत्रसंहिता 60 : 2 (MRV)
तू पृथ्वी हादरवलीस आणि तिला दुभंगवलेस, सारे जग कोलमडून पडले. आता ते पुन्हा एकत्र आण.
स्तोत्रसंहिता 60 : 3 (MRV)
तू तुझ्या लोकांना खूप त्रास दिलास. आम्ही दारु पिऊन झोकांड्या खाणाऱ्या आणि खाली पडणाऱ्या लोकांप्रमाणे आहोत.
स्तोत्रसंहिता 60 : 4 (MRV)
जे तुझी उपासना करतात त्यांना तू इशारा दिला होतास, त्यामुळे आता ते शत्रूंपासून सुटका करुन घेऊ शकतील.
स्तोत्रसंहिता 60 : 5 (MRV)
तू तुझी महान शक्ती वापर आणि आम्हाला वाचव. माझ्या प्रार्थनेला उत्तर दे आणि तू ज्यांच्यावर प्रेम करतोस त्या लोकांना वाचव.
स्तोत्रसंहिता 60 : 6 (MRV)
देव त्याच्या मंदिरात म्हणाला मी युध्द जिंकेन आणि विजयामुळे आनंदी होईन. मी ही जमीन माझ्या लोकांबरोबर वाटून घेईन. मी त्यांना शखेम आणि सुक्ाथाचेे खोरे देईन.
स्तोत्रसंहिता 60 : 7 (MRV)
गिलाद आणि मनश्शे माझे असेल, एफ्राईम, माझे शिरस्त्राण असेल आणि यहुदा माझा राजदंड असेल.
स्तोत्रसंहिता 60 : 8 (MRV)
मवाब माझे पाय धुण्याचे पात्र असेल, अदोम माझा जोडा नेणारा गुलाम असेल. मी पलिष्टी लोकांचा पराभव करीन आणि माझ्या विजयाबद्दल ओरडून सांगेन.
स्तोत्रसंहिता 60 : 9 (MRV)
मला त्या शक्तिशाली आणि सुरक्षित शहरात कोण नेईल? अदोमाशी लढायला मला कोण नेईल?
स्तोत्रसंहिता 60 : 10 (MRV)
देवा, हे करण्यासाठी मला फक्त तूच मदत करु शकतोस परंतु तू आम्हाला सोडून गेलास. तू आमच्या सैन्याबरोबर गेला नाहीस.
स्तोत्रसंहिता 60 : 11 (MRV)
देवा, तू आम्हाला शत्रूचा पराभव करण्यासाठी मदत कर. कारण लोक आम्हाला मदत करु शकत नाहीत.
स्तोत्रसंहिता 60 : 12 (MRV)
फक्त देवच आम्हाला बलवान करु शकतो देव आमच्या शत्रूचा पराभव करु शकतो. 13

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12