स्तोत्रसंहिता 61 : 1 (MRV)
देवा, माझे प्रार्थना गीत ऐक. माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे.
स्तोत्रसंहिता 61 : 2 (MRV)
मी कुठेही असलो कितीही अशक्त असलो तरी मी तुला मदतीसाठी हाक मारीन. तू मला अगदी उंचावरच्या सुरक्षित जागी घेऊन जा.
स्तोत्रसंहिता 61 : 3 (MRV)
तूच माझी सुरक्षित जागा आहेस. माझ्या शत्रूपासून माझे रक्षण करणारा तू बळकट किल्ला आहेस.
स्तोत्रसंहिता 61 : 4 (MRV)
तुझ्या तंबूत मला कायमचे राहायला पाहिजे, जेथे तू माझे रक्षण करु शकशील अशा ठिकाणी मला लपण्याची इच्छा आहे.
स्तोत्रसंहिता 61 : 5 (MRV)
देवा, मी तुला काही देण्याचे वचन दिले होते ते तू ऐकले होतेस परंतु तुझ्या उपासकांजवळ जे काही आहे ते तुझेच आहे.
स्तोत्रसंहिता 61 : 6 (MRV)
राजाला भरपूर आयुष्य दे त्याला कायमचे राहू दे.
स्तोत्रसंहिता 61 : 7 (MRV)
त्याला देवाजवळ चिरकाल राहू दे. तुझ्या खऱ्या प्रेमाने तू त्याचे रक्षण कर.
स्तोत्रसंहिता 61 : 8 (MRV)
आणि मी तुझ्या नावाचा सदैव जयजयकार करीन. ज्या गोष्टी करण्याचे मी वचन दिले त्या मी रोज करीन.

1 2 3 4 5 6 7 8

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: