स्तोत्रसंहिता 63 : 1 (MRV)
1 देवा, तू माझा देव आहेस आणि तू मला खूप हवा आहेस. माझा आत्मा आणि माझे शरीर तुझ्यासाठी शुष्क, बरड आणि पाणी विरहित जमिनी प्रमाणे तहाननेले आहे.
स्तोत्रसंहिता 63 : 2 (MRV)
2 होय, मी तुला तुझ्या मंदिरात पाहिले. मी तुझी शक्ती आणि तुझा गौरव पाहिला.
स्तोत्रसंहिता 63 : 3 (MRV)
3 तुझे प्रेम आयुष्यापेक्षा चांगले आहे. माझे ओठ तुझी स्तुती करतात.
स्तोत्रसंहिता 63 : 4 (MRV)
4 होय, मी जीवनात तुझी स्तुती करीन तुझ्या नावासाठी मी माझे बाहू प्रार्थनेत उभारीन.
स्तोत्रसंहिता 63 : 5 (MRV)
5 चांगले अन्न खाल्ल्याप्रमाणे मी तृप्त होईन आणि माझे तोंड तुझी स्तुती करील.
स्तोत्रसंहिता 63 : 6 (MRV)
6 अंथरुणावर झोपल्यावर मला तुझी आठवण येईल, मध्यरात्री मी तुझी आठवण काढेन.
स्तोत्रसंहिता 63 : 7 (MRV)
7 तू मला खरोखरच मदत केली आहेस. तू माझे रक्षण केलेस म्हणून मी आनंदी आहे.
स्तोत्रसंहिता 63 : 8 (MRV)
8 माझा आत्मा तुला धरुन ठेवतो आणि तू माझा हात धरतोस.
स्तोत्रसंहिता 63 : 9 (MRV)
9 काही लोक मला मारण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु त्यांचा नाश होईल. ते खाली त्यांच्या थडग्यात जातील.
स्तोत्रसंहिता 63 : 10 (MRV)
10 त्यांना तलवारीने मारले जाईल. रानटी कुत्री त्यांची प्रेते खातील.
स्तोत्रसंहिता 63 : 11 (MRV)
11 परंतु राजा त्याच्या देवाबरोबर आनंदात असेल आणि ज्या लोकांनी त्यांच्या आज्ञा पाळायचे वचन दिले ते त्याची स्तुती करतील का? कारण त्याने त्या खोटे बोलणाऱ्यांचा पराभव केला.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: