स्तोत्रसंहिता 67 : 1 (MRV)
देवा, मला दया दाखव आणि आशीर्वाद दे. कृपाकरुन आमच्या स्वीकार कर!
स्तोत्रसंहिता 67 : 2 (MRV)
देवा, पृथ्वीवरील प्रत्येक माणूस तुझ्या मार्गाविषयी समजून घेईल अशी मी आशा करतो. तू लोकांना कसा तारतोस ते प्रत्येक देशाला बघू दे.
स्तोत्रसंहिता 67 : 3 (MRV)
देवा, लोक तुझी स्तुती करु देत, सर्व लोक तुझी स्तुती करु देत.
स्तोत्रसंहिता 67 : 4 (MRV)
सगळ्या राष्ट्रांना हर्ष होऊ दे आणि ते सुखी होऊ दे. का? कारण तू लोकांचा योग्य रीतीने न्याय करतोस आणि तू प्रत्येक देशावर राज्य करतोस.
स्तोत्रसंहिता 67 : 5 (MRV)
देवा, लोक तुझी स्तुती करोत, सर्व लोक तुझी स्तुती करोत.
स्तोत्रसंहिता 67 : 6 (MRV)
देवा, आमच्या देवा, आम्हाला आशीर्वाद दे. आमची जमीन आम्हाला खूप पीक देवो.
स्तोत्रसंहिता 67 : 7 (MRV)
देव आम्हाला आशीर्वाद देवो आणि पृथ्वीवरील सर्व लोक देवाला घाबरोत आणि त्याला मान देवोत.

1 2 3 4 5 6 7

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: