स्तोत्रसंहिता 68 : 1 (MRV)
देवा, ऊठ आणि तुझ्या वैऱ्यांची दाणादाण उडव. त्याचे सगळे वैरी त्याच्यापासून दूर पळोत.
स्तोत्रसंहिता 68 : 2 (MRV)
तुझे वैरी वाऱ्यावर दूरवर जाणाऱ्या धुरासारखे दूरवर जावोत. आगीत वितळणाऱ्या मेणाप्रमाणे तुझ्या वैऱ्यांचा सर्वनाश होवो.
स्तोत्रसंहिता 68 : 3 (MRV)
परंतु चांगले लोक आनंदात आहेत. चांगल्या लोकांचा देवाबरोबर आनंदात वेळ जातो. चांगले लोक आनंदात जगतात आणि सुखी होतात.
स्तोत्रसंहिता 68 : 4 (MRV)
देवासाठी गाणे म्हणा त्याच्या नावाचे गुणगान करा, देवासाठी रस्ता तयार करा. तो त्याच्या रथात बसून वाळवंटातून जातो त्याचे नाव यादे आहे. त्याच्या नावाची स्तुती करा.
स्तोत्रसंहिता 68 : 5 (MRV)
देव त्याच्या पवित्र मंदिरात अनाथांचा बाप होतो. तो विधवांची काळजी घेतो.
स्तोत्रसंहिता 68 : 6 (MRV)
देव एकाकी लोकांना घर देतो, देव त्याच्यामाणसांना तुंरुगातून बाहेर काढतो, ते फार आनंदी आहेत. परंतु जे लोक देवाच्या विरुध्द जातात ते त्याच्या आगीसारख्या तुरुंगात राहातील.
स्तोत्रसंहिता 68 : 7 (MRV)
देवा, तू तुझ्या माणसांना मिसरमधून बाहेर काढलेस. तू वाळवंटातून चालत गेलास.
स्तोत्रसंहिता 68 : 8 (MRV)
आणि भूमी थरथरली. देव, इस्राएलचा देव सिनाय डोंगरावर आला आणि आकाश वितळायला लागले.
स्तोत्रसंहिता 68 : 9 (MRV)
देवा, थकलेल्या जीर्ण झालेल्या भूमीला पुन्हा शक्ती येण्यासाठी तू पाऊस पाठवलास.
स्तोत्रसंहिता 68 : 10 (MRV)
तुझे प्राणी पुन्हा त्या ठिकाणी आले. देवा, तू तिथल्या गरीब लोकांना बऱ्याच चांगल्या वस्तू दिल्यास.
स्तोत्रसंहिता 68 : 11 (MRV)
देवाने आज्ञा केली आणि बरेच लोक चांगली बातमी सांगण्यासाठी गेले.
स्तोत्रसंहिता 68 : 12 (MRV)
शक्तिमान राजांची सैन्ये पळून गेली. सैनिकांनी युध्दातून घरी आणलेल्या वस्तूंची विभागणी बायका घरी करतील. जे लोक घरीच राहिले होते ते ही संपत्तीत वाटा घेतील.
स्तोत्रसंहिता 68 : 13 (MRV)
त्यांना कबुतराचे चांदीने मढवलेले पंख मिळतील. त्यांना सोन्याने मढवलेले आणि चकाकणारे पंख मिळतील.
स्तोत्रसंहिता 68 : 14 (MRV)
देवाने साल्मोन डोंगरावर शत्रूंच्या राजाची दाणदाण उडवली त्यांची अवस्था पडणाऱ्या हिमासाखी झाली.
स्तोत्रसंहिता 68 : 15 (MRV)
बाशानचा पर्वत उंच सुळके असेलला मोठा पर्वत आहे.
स्तोत्रसंहिता 68 : 16 (MRV)
बाशान, तू सियोन पर्वताकडे तुच्छेतेने का पाहतोस? देवाला तो पर्वत (सियोन) आवडतो. परमेश्वराने कायमचे तिथेच राहाणे पसंत केले.
स्तोत्रसंहिता 68 : 17 (MRV)
परमेश्वर पवित्र सियोन पर्वतावर येतो. त्याच्या मागे त्याचे लाखो रथ असतात.
स्तोत्रसंहिता 68 : 18 (MRV)
तो उंच पर्वतावर गेला, त्याने कैद्यांची पलटण बरोबर नेली. त्याने माणसांकडून जे त्याच्या विरुध्द होते, त्यांच्याकडूनही नजराणे घेतले. परमेश्वर, देव तेथे राहाण्यासाठी गेला.
स्तोत्रसंहिता 68 : 19 (MRV)
परमेश्वराची स्तुती करा. तो रोज आपल्याला आपले ओझे वाहायला मदत करतो देव आपल्याला तारतो.
स्तोत्रसंहिता 68 : 20 (MRV)
तो आपला देव आहे आपल्याला तारणारा तोच तो देव आहे. परमेश्वर, आपला देव आपल्याला मरणापासून वाचवतो.
स्तोत्रसंहिता 68 : 21 (MRV)
देवाने त्याच्या शत्रूंचा पराभव केला हे तो दाखवून देईल.जे त्याविरुध्द लढले. त्यांना देव शिक्षा करील.
स्तोत्रसंहिता 68 : 22 (MRV)
माझा धनी म्हणाला, “मी शत्रूला बाशान पर्वतावरुन परत आणीन. मी शत्रूला पश्चिमेकडून परत आणीन.
स्तोत्रसंहिता 68 : 23 (MRV)
म्हणजे तुम्हाला त्यांच्या रक्तातून चालत जाता येईल. तुमच्या कुत्र्यांना त्यांचे रक्त चाटता येईल.”
स्तोत्रसंहिता 68 : 24 (MRV)
विजयाच्या मिरवणुकीचे नेतृत्व करणाऱ्या देवाला लोक बघतात. माझा देव, माझा राजा विजयांच्या मिरवणुकीचे नेतृत्व करीत आहे, ते लोक बघतात.
स्तोत्रसंहिता 68 : 25 (MRV)
गायक वाजत गाजत पुढे येतील. नंतर तरुण मुली खांजिऱ्या वाजवतील. त्यांच्या नंतर वाद्य वाजवणारे असतील.
स्तोत्रसंहिता 68 : 26 (MRV)
मोठ्या मंडळात देवाचा जय जयकार करा. इस्राएलाच्या लोकांनो परमेश्वराची स्तुती करा.
स्तोत्रसंहिता 68 : 27 (MRV)
छोटा बन्यामीन त्यांचे नेतृत्व करीत आहे आणि तेथे यहूदाचे मोठे कुटुंब जबुलूनाचे नेते आणि नफतालीचे नेते आहेत.
स्तोत्रसंहिता 68 : 28 (MRV)
देवा, आम्हाला तुझी शक्ती दाखव. तू पूर्वी आमच्यासाठी तुझी शक्ती वापरलीस ती दाखव.
स्तोत्रसंहिता 68 : 29 (MRV)
राजे त्यांची संपत्ती तुझ्याकडे आणतील, तुझ्या यरुशलेममधील प्रासादात ती आणतील.
स्तोत्रसंहिता 68 : 30 (MRV)
त्या “प्राण्यानी” तुला हवे ते करावे म्हणून तू तुझ्या काठीचा उपयोग करत्या देशातील “बैलांना” आणि “गायींना” तुझ्या आज्ञेचे पालन करायला लाव. तू त्या देशांचा युध्दात पराभव केला आहेस आता त्यांना तुझ्यासाठी चांदी आणायला सांग.
स्तोत्रसंहिता 68 : 31 (MRV)
त्यांना मिसरमधून संपत्ती आणायला सांग देवा, इथिओपियातल्या लोकांना त्यांची संपत्ती तुझ्याकडे आणायला भाग पाड.
स्तोत्रसंहिता 68 : 32 (MRV)
पृथ्वीवरच्या राजांनो, देवासाठी गाणे म्हणा, त्याच्यासाठी स्तुतिगीत गा.
स्तोत्रसंहिता 68 : 33 (MRV)
देवासाठी गाणे म्हणा देव पुरातन आकाशातून त्याचा रथ नेतो, त्याचा जोरदार आवाज ऐका.
स्तोत्रसंहिता 68 : 34 (MRV)
तुमच्या इतर देवांपेक्षा हा देव अधिक शक्तिमान आहे. इस्राएलाचा देव त्याच्या लोकांना अधिक शक्तिमान बनवतो.
स्तोत्रसंहिता 68 : 35 (MRV)
देव त्याच्या मंदिरात भीतिदायक दिसतो. इस्राएलचा देव त्याच्या लोकांना शक्ती आणि सामर्थ्य देतो. देवाचे गुणगान करा.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35