स्तोत्रसंहिता 7 : 1 (MRV)
परमेश्वरा, माझ्या देवा, माझा तुझ्यावर विश्वास आहे. माझा पाठलाग करणाऱ्या लोकांपासून मला वाचव मला सोडव.
स्तोत्रसंहिता 7 : 2 (MRV)
तू जर मला मदत केली नाहीस तर सिंहाच्या तावडीत सापडलेल्या एखाद्या प्राण्यासारखी माझी अवस्था होईल मला दूर नेले जाईल आणि कुणीही मला वाचवू शकणार नाही.
स्तोत्रसंहिता 7 : 3 (MRV)
परमेश्वर देवा मी काहीही चूक केलेली नाही. मी चूक केली नसल्याबद्दल खात्रीपूर्वक सांगतो.
स्तोत्रसंहिता 7 : 4 (MRV)
मी माझ्या मित्रांशी दुष्टावा केला नाही आणि मी मित्रांच्या शत्रूंना मदतही केली नाही.
स्तोत्रसंहिता 7 : 5 (MRV)
जर हे खरे नसेल तर मला शिक्षा कर. शत्रू माझा पाठलाग करो, मला पकडो व मला मारो. त्याला माझे जीवन जमिनीत तुडवूदे आणिमाझा जीव मातीत ढकलू दे.
स्तोत्रसंहिता 7 : 6 (MRV)
परमेश्वरा ऊठ, आणि तुझा क्रोध दाखव माझा शत्रू रागावलेला आहे म्हणून तू त्याच्या पुढे उभा राहा आणि त्याच्या विरुध्द लढ. परमेश्वरा ऊठ आणि न्यायाची मागणी कर.
स्तोत्रसंहिता 7 : 7 (MRV)
परमेश्वरा. लोकांचा निवाडा कर. सगळे देश तुझ्याभोवती गोळा कर आणि लोकांचा निवाडा कर.
स्तोत्रसंहिता 7 : 8 (MRV)
परमेश्वरा, माझा निवाडा कर. मी बरोबर आहे हे सिध्द कर मी निरपराध आहे हे सिध्द कर.
स्तोत्रसंहिता 7 : 9 (MRV)
वाईटांना शिक्षा कर आणि चांगल्यांना मदत कर. देवा तू चांगला आहेस आणि तू लोकांच्या ह्दयात डोकावून बघू शकतोस.
स्तोत्रसंहिता 7 : 10 (MRV)
ज्याचे ह्दय सच्चे आहे अशांना देव मदत करतो म्हणून तो माझे रक्षण करेल.
स्तोत्रसंहिता 7 : 11 (MRV)
देव चांगला न्यायाधीश आहे आणि तो त्याचा क्रोध केव्हाही व्यक्त करु शकतो.
स्तोत्रसंहिता 7 : 12 (MRV)
देवाने एकदा निर्णय घेतल्यानंतर तो त्याचे मन बदलत नाही.
स्तोत्रसंहिता 7 : 13 (MRV)
देवाकडे लोकांना शिक्षा करायची शक्ती आहे.
स्तोत्रसंहिता 7 : 14 (MRV)
काही लोक सतत वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखत असतात. ते गुप्त योजना आखतात आणि खोटे बोलतात.
स्तोत्रसंहिता 7 : 15 (MRV)
ते दुसऱ्यांना जाळ्यात पकडतात आणि त्यांना इजा करतात. परंतु ते स्वतच्याच जाळ्यात अडकतील आणि त्याना कुठली तरी इजा होईल.
स्तोत्रसंहिता 7 : 16 (MRV)
त्यांना योग्य अशी शिक्षा मिळेल. ते इतरांशी फार निर्दयपणे वागले. त्यांनाही योग्य अशीच शिक्षा मिळेल.
स्तोत्रसंहिता 7 : 17 (MRV)
मी परमेश्वराची स्तुती करतो, कारण तो चांगला आहे मी त्या सर्वशक्तिमान परमेश्वराच्या नावाची स्तुती करतो
❮
❯