स्तोत्रसंहिता 74 : 1 (MRV)
देवा, तू आम्हाला कायमचाच सोडून गेलास का? देवा, तू तुझ्या माणसांवर अजूनही रागावलेला आहेस का?.
स्तोत्रसंहिता 74 : 2 (MRV)
तू खूप दिवसांपूर्वी ज्या लोकांना विकत घेतलेस त्यांची आठवण ठेव. तू आम्हाला वाचवलेस आता आम्ही तुझे आहोत. ज्या सियोनाच्या डोंगरावर तू राहिलास त्याची आठवण तुला होते का?
स्तोत्रसंहिता 74 : 3 (MRV)
देवा, ये आणि या प्राचीन अवशेषांमधून चाल. शत्रूंनी ज्या पवित्र जागेचा नाश केला तिथे परत ये.
स्तोत्रसंहिता 74 : 4 (MRV)
शत्रूंनी मंदिरात युध्द गर्जना केल्या. ते युध्द जिंकले आहे हे दाखविण्यासाठी त्यांनी मंदिरात झेंडे फडकवले.
स्तोत्रसंहिता 74 : 5 (MRV)
फावड्याने गवत कापणाऱ्यासारखे शत्रुचे सैनिक दिसत होते.
स्तोत्रसंहिता 74 : 6 (MRV)
देवा, त्यांनी कुऱ्हाडीचा आणि हातोडीचा उपयोग करुन तुझ्या मंदिरातील कोरीव काम तोडून टाकले.
स्तोत्रसंहिता 74 : 7 (MRV)
त्या सैनिकांनी तुझे पवित्र स्थान जाळून टाकले. तुझ्या नावाला गौरव प्राप्त करुन देण्यासाठी ते मंदिर बांधले होते पण त्यांनी ते मातीत मिळवले.
स्तोत्रसंहिता 74 : 8 (MRV)
शत्रूंनी आमचा संपूर्ण नाश करायचे ठरवले. त्यांनी देशातील प्रत्येक पवित्र स्थानजाळून टाकले.
स्तोत्रसंहिता 74 : 9 (MRV)
आम्हाला आमचे एकही चिन्ह दिसू शकले नाही. आता कोणी संदेष्टे राहिले नाही. कुणालाही काय करावे ते कळत नाही.
स्तोत्रसंहिता 74 : 10 (MRV)
देवा, आणखी किती काळ शत्रू आमची चेष्टा करणार आहेत? तू त्यांना कायमचीच तुझ्या नावाचा अनादर करायची परवानगी देणार आहेस का?
स्तोत्रसंहिता 74 : 11 (MRV)
देवा, तू आम्हाला इतकी मोठी शिक्षा का दिलीस? तू तुझी महान सत्ता वापरलीस आणि आमचा संपूर्ण नाश केलास.
स्तोत्रसंहिता 74 : 12 (MRV)
देवा, तू खूप काळापासून आमचा राजा आहेस या देशात लढाया जिंकायला तू आम्हाला मदत केलीस.
स्तोत्रसंहिता 74 : 13 (MRV)
देवा, लाल समुद्र दुभागण्यासाठी तू तुझ्या शक्तीचा उपयोग केलास.
स्तोत्रसंहिता 74 : 14 (MRV)
समुद्रातल्या मोठ्या राक्षसांचा तू पराभव केलास लिव्याथानाचे डोके तू ठेचलेस आणि त्याचे शरीर प्राण्यांना खाण्याकरता ठेवून दिलेस.
स्तोत्रसंहिता 74 : 15 (MRV)
तू नद्या नाल्यांना पाणी आणतोस आणि तूच नद्या कोरड्या करतोस.
स्तोत्रसंहिता 74 : 16 (MRV)
देवा, तू दिवसावर आणि रात्रीवर नियंत्रण ठेवतोस. सूर्य आणि चंद्र तूच निर्माण केलेस.
स्तोत्रसंहिता 74 : 17 (MRV)
पृथ्वीवरील प्रत्येक गोष्ट तूच सीमित केलीस.तूच उन्हाळा आणि हिवाळा निर्माण केलास.
स्तोत्रसंहिता 74 : 18 (MRV)
देवा, या गोष्टींची आठवण ठेव. शत्रूंनी तुझा प्राण उतारा केला ते लक्षात असू दे. ती मूर्ख माणसे तुझ्या नावाचा तिरस्कार करतात.
स्तोत्रसंहिता 74 : 19 (MRV)
त्या जंगली प्राण्यांना तुझे कबुतर घेऊ देऊ नकोस. तुझ्या गरीब माणसांना कायमचे विसरु नकोस.
स्तोत्रसंहिता 74 : 20 (MRV)
आपला करार आठव या देशातील प्रत्येक अंधाऱ्या कोपऱ्यात हिंसा आहे.
स्तोत्रसंहिता 74 : 21 (MRV)
देवा, तुझ्या माणसांना वाईट वागणुक मिळाली. त्यांना आणखी दु:ख होणार नाही असे पाहा. गरीब आणि असहाय्य लोक तुझी स्तुती करतात.
स्तोत्रसंहिता 74 : 22 (MRV)
देवा, ऊठ! आणि युध्द कर! त्या मूर्खांनी तुला आव्हान दिले याची आठवण ठेव.
स्तोत्रसंहिता 74 : 23 (MRV)
तुझ्या शत्रूंच्या आरोळ्या विसरु नकोस त्यांनी तुझा पुन्हा पुन्हा अपमान केला आहे.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23