स्तोत्रसंहिता 8 : 1 (MRV)
परमेश्वरा, माझ्या स्वामी तुझे नाव पृथ्वीवरील नावात सर्वात चांगले आहे, थोर आहे. तुझ्या नावाने तुला स्वर्गात गौरव प्राप्तकरुन दिला आहे.
स्तोत्रसंहिता 8 : 2 (MRV)
मुला बाळांच्या मुखातून तुझे गुणगान ऐकू येते तुझ्या शंत्रूना गप्प बसवण्यासाठी तू हे सारे करतोस.
स्तोत्रसंहिता 8 : 3 (MRV)
परमेश्वरा, तू तुझ्या हातांनी निर्माण केलेल्या आकाशाकडे मी बघतो तू केलेल्या चंद्र आणि ताऱ्यांकडे मी बघतो. आणि मला आश्चर्य वाटते.
स्तोत्रसंहिता 8 : 4 (MRV)
लोक तुला इतके महत्वाचे का वाटतात? तू त्यांची आठवण तरी का ठेवतोस? लोकतुझ्यासाठी इतके महत्वाचे का आहेत? तू त्यांची दखल तरी का घेतोस?
स्तोत्रसंहिता 8 : 5 (MRV)
परंतु लोक तुला महत्वाचे वाटतात. तू त्यांना जवळ जवळ देवच बनवलेस आणि तू लोकांना गौरवाचे आणि मानाचे मुकुट चढवितोस.
स्तोत्रसंहिता 8 : 6 (MRV)
तू लोकांना तू निर्माण केलेल्या सर्व गोष्टींचे अधिपत्य दिलेस.
स्तोत्रसंहिता 8 : 7 (MRV)
लोक मेंढ्या, गाय, बैल आणि रानातले वन्य पशू यांच्यावर राज्य करतात.
स्तोत्रसंहिता 8 : 8 (MRV)
ते आकाशातल्या पक्ष्यांवर आणि सागरात पोहणाऱ्या माशावर राज्य करतात.
स्तोत्रसंहिता 8 : 9 (MRV)
परमेश्वरा, आमच्या स्वामी तुझे नाव पृथ्वीवरील सर्व नावात अतिशय चांगले आहे, अद्भुत आहे.

1 2 3 4 5 6 7 8 9

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: