स्तोत्रसंहिता 81 : 1 (MRV)
आनंदी राहा आणि आमची शक्ती असलेल्या देवासमोर गाणे गा, इस्राएलाच्या देवासमोर आनंदाने ओरडा.
स्तोत्रसंहिता 81 : 2 (MRV)
संगीताची सुरुवात करा. डफ वाजवा. सतार आणि वीणा वाजवा.
स्तोत्रसंहिता 81 : 3 (MRV)
अमावास्येला एडक्याच्या शिंगाचा कर्णा वाजवा. पौर्णिमेला ही एडक्याच्या शिंगाचा कर्णा वाजवा. याचवेळी आपला सण सुरु होतो.
स्तोत्रसंहिता 81 : 4 (MRV)
हा इस्राएल देशाचा नियम आहे. देवाने याकोबाला हीच आज्ञा केली.
स्तोत्रसंहिता 81 : 5 (MRV)
जेव्हा देवाने त्याला मिसरमधून दूर नेले तेव्हा त्याने योसेफाबरोबर हा करार केला. मिसरमध्येच आम्ही आम्हाला न समजणारी भाषा ऐकली.
स्तोत्रसंहिता 81 : 6 (MRV)
देव म्हणतो, “मी तुमच्या खांद्यावरचे ओझे उचलले. तुमच्या खांद्यावरची कामगाराची टोपली तुम्हाला टाकायला लावली.
स्तोत्रसंहिता 81 : 7 (MRV)
तुम्ही लोक संकटात होता. तुम्ही मदतीसाठी हाका मारल्या आणि मी तुमची मुक्तता केली. मी वादळी ढगात लपलो होतो आणि मी तुम्हाला उत्तर दिले. मी मरीबाच्या पाण्याजवळ तुमची परीक्षा घेतली.”
स्तोत्रसंहिता 81 : 8 (MRV)
“लोकहो! माझे ऐका, मी तुम्हाला माझा करार देईन इस्राएल कृपा करुन माझे ऐक.
स्तोत्रसंहिता 81 : 9 (MRV)
परदेशी लोक ज्या चुकीच्या देवाची पूजा करतात त्यापैकी कुठल्याही देवाची पूजा करु नकोस.
स्तोत्रसंहिता 81 : 10 (MRV)
मी, परमेश्वरच तुमचा देव आहे मी तुम्हाला मिसरच्या प्रदेशातून बाहेर आणले. इस्राएल, तुझे तोंड उघड मग मी तुला खायला घालीन.”
स्तोत्रसंहिता 81 : 11 (MRV)
“परंतु माझ्या लोकांनी माझे ऐकले नाही. इस्राएलने माझी आज्ञा पाळली नाही.
स्तोत्रसंहिता 81 : 12 (MRV)
म्हणून मी त्यांना जे करायची इच्छा होती ते करु दिले. इस्राएलने सुध्दा त्याला हवे ते केले.
स्तोत्रसंहिता 81 : 13 (MRV)
जर माझ्या लोकांनी माझे ऐकले, जर इस्राएल माझ्या इच्छे प्रमाणे राहिला,
स्तोत्रसंहिता 81 : 14 (MRV)
तर मी त्यांच्या शत्रूंचा पराभव करीन. जे लोक इस्राएलवर संकटे आणतात त्यांना मी शिक्षा करीन.
स्तोत्रसंहिता 81 : 15 (MRV)
परमेश्वराचे शत्रू भीतीने थरथर कापतील. त्यांना कायमची शिक्षा होईल.
स्तोत्रसंहिता 81 : 16 (MRV)
देव त्याच्या माणसांना सगळ्यात चांगला गहू देईल. देव त्याच्या माणसांना त्यांचे समाधान होईपर्यंत मध देईल.”
❮
❯