स्तोत्रसंहिता 83 : 1 (MRV)
देवा, गप्प राहू नकोस. तुझे कान बंद करु नकोस. देवा, कृपा करुन काही तरी बोल.
स्तोत्रसंहिता 83 : 2 (MRV)
देवा, तुझे शत्रू तुझ्याविरुध्द योजना आखत आहेत. ते लवकरच हल्ला करतील.
स्तोत्रसंहिता 83 : 3 (MRV)
ते तुझ्या लोकांविरुध्द गुप्त योजना आखत आहेत. ते तू ज्या माणसांवर प्रेम करतोस त्या माणसांविरुध्दच्या योजनाची चर्चा करत आहेत.
स्तोत्रसंहिता 83 : 4 (MRV)
ते शत्रू म्हणत आहेत, “या त्यांचा पूर्णनिपात करु. यानंतर कोणालाही “इस्राएल” या शब्दाची आठवण सुध्दा येणार नाही.”
स्तोत्रसंहिता 83 : 5 (MRV)
देवा, ते सगळे लोक तुझ्याविरुध्द आणि तू आमच्याशी केलेल्या करारा विरुध्द लढण्यासाठी एकत्र आले.
स्तोत्रसंहिता 83 : 6 (MRV)
(6-7) ते शत्रू आमच्याशी लढण्यासाठी एकत्र आले, अदोम आणि इश्माएलीचे लोक, मवाब आणि हागारचे वंशज गाबाल, अम्मोन अमालेकचे लोक, पलेशेथ आणि सोरचे लोक. ते सगळे लोक आमच्याशी लढायला एकत्र आले.
स्तोत्रसंहिता 83 : 7 (MRV)
स्तोत्रसंहिता 83 : 8 (MRV)
अश्शूरही त्यांना मिळाले. त्यांनी लोटाच्या वंशजांना खूप बलशाली बनवले.
स्तोत्रसंहिता 83 : 9 (MRV)
देवा, तू जसा मिद्यानचा, सीसरा व याबीन यांचा किशोन नदीजवळ पराभव केलास तसाच तू शत्रूचा पराभव कर.
स्तोत्रसंहिता 83 : 10 (MRV)
तू त्यांचा एन - दोर येथे पराभव केलास आणि त्यांची प्रेते जमिनीवर कुजली आणि त्यांचे खत बनले.
स्तोत्रसंहिता 83 : 11 (MRV)
देवा, शत्रूच्या प्रमुखाचा पराभव कर. तू ओरेब व जेब यांचे जे केलेस तेच त्यांचेही कर जेबह व सलमुन्ना यांचे जे केलेस तसेच त्यांचे ही कर.
स्तोत्रसंहिता 83 : 12 (MRV)
देवा, ते लोक आम्हाला जबरदस्तीने तुझ्या वस्तीवरुन जायला सांगत होते म्हणजे त्यांना तिचा ताबा घेता येईल.
स्तोत्रसंहिता 83 : 13 (MRV)
देवा, तू त्यांना गवतासारखे वाऱ्यावर उडवून लाव वाऱ्याने वाळलेलं गवत इतस्तता पसरतं तस तू त्यांना पसरवून दे.
स्तोत्रसंहिता 83 : 14 (MRV)
अग्री जसा जंगलाचा व डोंगराचा नाश करतो तसा तू शत्रूचा नाश कर.
स्तोत्रसंहिता 83 : 15 (MRV)
देवा, वादळात धूळ जशी उडून जाते, तसे तू त्या लोकांचा पाठलाग करुन त्यांना उडवून लाव. त्यांना गदगदा हलव आणि तुफानात उडवून दे.
स्तोत्रसंहिता 83 : 16 (MRV)
देवा, आपण खरोखरच अशक्त आहोत हे त्यांना कळून येऊ दे. नंतर त्यांना तुझ्या नावाचा धावा करायची इच्छा होईल.
स्तोत्रसंहिता 83 : 17 (MRV)
देवा, त्या लोकांना खूप घाबरवून सोड आणि त्यांना कायमचे लज्जित कर. त्यांना काळीमा फास आणि त्यांचा नाश कर.
स्तोत्रसंहिता 83 : 18 (MRV)
नंतर त्यांना तू देव आहेस हे कळेल. तुझे नाव यहोवा आहे हे त्यांना कळेल. तू सर्वशक्तिमान देवच सर्व जगाचा देव आहेस हे ही त्यांना कळेल.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: