देवाने आपले मंदिर यरुशलेमच्या पवित्र डोंगरावर बांधले.
स्तोत्रसंहिता 87 : 2 (MRV)
परमेश्वराला सियोनचे द्वार इस्राएलमधल्या इतर ठिकाणापेक्षा अधिक आवडते.
स्तोत्रसंहिता 87 : 3 (MRV)
हे देवाच्या नगरी लोक तुझ्याबद्दल आश्चर्यजनक गोष्टी सांगतात.
स्तोत्रसंहिता 87 : 4 (MRV)
देव त्याच्या सर्व माणसांची यादी ठेवतो त्यापैकी काही मिसर आणि बाबेल मध्ये राहातात. त्यापैकी काहींचा जन्म पलेशेथ, सोर आणि कूश येथे झाला.
स्तोत्रसंहिता 87 : 5 (MRV)
सियोनात जन्मलेल्या प्रत्येकाला देव ओळखतो. सर्वशक्तिमान देवाने ते नगर बांधले.
स्तोत्रसंहिता 87 : 6 (MRV)
देव त्याच्या सर्व लोकांविषयीची यादी ठेवतो. प्रत्येकाचा जन्म कुठे झाला ते त्याला माहीत आहे.
स्तोत्रसंहिता 87 : 7 (MRV)
देवाचे लोक यरुशलेमला खास सण साजरा करण्यासाठी जातात. ते खूप आनंदी आहेत. ते गाणी गातात, नाच करतात. ते म्हणतात, “सगळ्या चांगल्या गोष्टी यरुशलेम मधून येतात.”