स्तोत्रसंहिता 89 : 1 (MRV)
1 मी सदैव परमेश्वराच्या प्रेमाचे गाणे गाईन मी सदैव त्याच्या इमानदारीचे गाणे गाईन.
स्तोत्रसंहिता 89 : 2 (MRV)
2 परमेश्वरा, तुझे प्रेम सार्वकालिक आहे यावर माझा विश्वास आहे. तुझी इमानदारी आकाशा इतकी अथांग आहे.
स्तोत्रसंहिता 89 : 3 (MRV)
3 देव म्हणाला, “मी निवडलेल्या राजाशी करार केला. मी दावीदला, माझ्या सेवकाला वचन दिले.
स्तोत्रसंहिता 89 : 4 (MRV)
4 दावीद, मी तुझा वंश चालू राहील असे करीन. तुझे राज्य सदैव राहील असे मी करीन.”
स्तोत्रसंहिता 89 : 5 (MRV)
5 परमेश्वरा, तू अद्भुत गोष्टी करतोस याबद्दल स्वर्ग तुझी स्तुती करतात. लोक तुझ्यावर अवलंबून राहू शकतात. पवित्र लोकांची सभा याबद्दलचे गाणे गाते.
स्तोत्रसंहिता 89 : 6 (MRV)
6 स्वर्गातला कोणीही परमेश्वरा समान नाही. “देवा” पैकी कुणाचीही परमेश्वराशील तुलना होऊ शकत नाही.
स्तोत्रसंहिता 89 : 7 (MRV)
7 देव पवित्र लोकांना भोटतो. ते देवदूत त्याच्या सभोवती असतात. ते देवाला घाबरतात आणि त्याला मान देतात. ते भयग्रस्त होऊन त्याच्या भोवती उभे राहातात.
स्तोत्रसंहिता 89 : 8 (MRV)
8 सर्वशाक्तिमान परमेश्वरा, देवा, तुझ्यासारखा कुणीही इथे नाही. आम्ही तुझ्यावर संपूर्ण विश्वास टाकू शकतो.
स्तोत्रसंहिता 89 : 9 (MRV)
9 तू गर्वाने समुद्रावर राज्य करतोस तू त्याच्या क्रोधित लाटांना शांत करु शकतोस.
स्तोत्रसंहिता 89 : 10 (MRV)
10 देवा, तू राहाबचा पराभव केलास तू तुझ्या बलवान बाहूंनी तुझ्या शत्रूंना इतस्तत पांगवलेस.
स्तोत्रसंहिता 89 : 11 (MRV)
11 देवा, स्वर्गातल्या आणि पृथ्वीवरच्या सर्वगोष्टी तुझ्या आहेत, तूच जग आणि त्यातल्या सर्वगोष्टी निर्माण केल्यास.
स्तोत्रसंहिता 89 : 12 (MRV)
12 उत्तरेकडच्या आणि दक्षिणेकडच्या सर्व गोष्टी तूच निर्माण केल्यास ताबोर पर्वत आणि हार्मोन पर्वत तुझ्या नावाचा जयजयकार करतात.
स्तोत्रसंहिता 89 : 13 (MRV)
13 देवा, तुझ्याजवळ शक्ती आहे. तुझीशक्ती महान आहे. विजय तुझाच आहे.
स्तोत्रसंहिता 89 : 14 (MRV)
14 तुझे राज्य सत्य आणि न्याय यावर वसलेले आहे. प्रेम आणि सत्य तुझ्या सिंहासनासमोर सेवक आहेत.
स्तोत्रसंहिता 89 : 15 (MRV)
15 देवा, तुझे इमानी भक्त खरोखरच सुखी आहेत. ते तुझ्या दयेच्या प्रकाशात जगतात.
स्तोत्रसंहिता 89 : 16 (MRV)
16 तुझे नाव त्यांना नेहमी आनंद देते. ते तुझ्या चांगलुपणाची स्तुती करतात.
स्तोत्रसंहिता 89 : 17 (MRV)
17 तू त्यांची अद्भुत शक्ती आहेस. त्यांची शक्ती तुझ्यापासूनच येते.
स्तोत्रसंहिता 89 : 18 (MRV)
18 परमेश्वरा, तू आमचा रक्षणकर्ता आहेस. इस्राएलचा पवित्र देव आमचा राजा आहे.
स्तोत्रसंहिता 89 : 19 (MRV)
19 तू तुझ्या भक्तांशी दृष्टांतात बोललास आणि म्हणालास, “मी गर्दीतला एक माणूस निवडला आणि त्या माणसाला महत्व दिले. मी त्या तरुण सैनिकाला बलवान केले.
स्तोत्रसंहिता 89 : 20 (MRV)
20 माझा सेवक दावीद मला सापडला आणि मी त्याला माझ्या खास तेलाने अभिषेक केला.
स्तोत्रसंहिता 89 : 21 (MRV)
21 मी दावीदला माझ्या उजव्या हाताने आधार दिला आणि माझ्या शक्तीने मी त्याला बलवान केले.
स्तोत्रसंहिता 89 : 22 (MRV)
22 त्या निवडलेल्या राजाचा शत्रू पराभव करु शकला नाही. दुष्टलोक त्याचा पराभव करु शकले नाहीत.
स्तोत्रसंहिता 89 : 23 (MRV)
23 मी त्याच्या शत्रूंना संपवले, जे लोक माझ्या निवडलेल्या राजाचा तिरस्कार करीत होते त्यांचा मी पराभव केला.
स्तोत्रसंहिता 89 : 24 (MRV)
24 माझ्या निवडलेल्या राजावर मी नेहमी प्रेम करीन आणि त्याला मदत करीन. मी त्याला नेहमी सामर्थ्यवान बनवेन.
स्तोत्रसंहिता 89 : 25 (MRV)
25 मी माझ्या निवडलेल्या राजाला समुद्राच्या हाती सोपवले, तो नद्यांना काबूत ठेवल.
स्तोत्रसंहिता 89 : 26 (MRV)
26 तो मला म्हणेल, ‘तुम्ही माझे वडील आहात तू माझा देव आहेस माझा खडक माझा तारणारा आहेस.’
स्तोत्रसंहिता 89 : 27 (MRV)
27 आणि मी त्याला माझा पहिला मुलगा बनवेन. तो पृथ्वीवरचा महान राजा असेल.
स्तोत्रसंहिता 89 : 28 (MRV)
28 माझे प्रेम त्या राजाचे सदैव रक्षण करेल त्याच्या बरोबरचा माझा करार कधीही संपणार नाही.
स्तोत्रसंहिता 89 : 29 (MRV)
29 त्याचा वंश सदैव चालू राहील. स्वर्ग असेपर्यंत त्याचे राज्य असेल.
स्तोत्रसंहिता 89 : 30 (MRV)
30 जर त्याचे वंशज माझा कायदा पाळायचे थांबवतील आणि माझ्या आज्ञा पाळणे बंद करतील तर मी त्यांना शिक्षा करेन.
स्तोत्रसंहिता 89 : 31 (MRV)
31 जर त्या निवडलेल्या राजाच्या वंशजांनी माझे नियम मोडले.
स्तोत्रसंहिता 89 : 32 (MRV)
32 आणि माझ्या आज्ञांकडे दुर्लक्ष केले तर मी त्यांना जबरदस्त शिक्षा करेन.
स्तोत्रसंहिता 89 : 33 (MRV)
33 परंतु त्या लोकांवरचे माझे प्रेम मी कधीच बाजूला करणार नाही. मी त्यांच्याशी नेहमी निष्ठावान राहीन.
स्तोत्रसंहिता 89 : 34 (MRV)
34 मी दावीदशी झालेला माझा करार मोडणार नाही. मी आमचा करार बदलणार नाही.
स्तोत्रसंहिता 89 : 35 (MRV)
35 माझ्या पवित्रतेतून मी त्याला वचन दिले आहे आणि मी दावीदशी खोटे बोलणार नाही.
स्तोत्रसंहिता 89 : 36 (MRV)
36 दावीदाचा वंश सदैव चालू राहील. त्याचे राज्य सूर्य असे पर्यंत राहील.
स्तोत्रसंहिता 89 : 37 (MRV)
37 ते चंद्राप्रमाणे सदैव राहील. आकाश या कराराचा पुरावा आहे त्या करारावर तुम्ही विश्वास ठेवू शकता.”
स्तोत्रसंहिता 89 : 38 (MRV)
38 पण देवा, तू तुझ्या निवडलेल्या राजावर रागावलास आणि तू त्याला एकटे सोडून दिलेस.
स्तोत्रसंहिता 89 : 39 (MRV)
39 तू तुझा करार पाळला नाहीस. तू राजाचा मुकुट धुळीत फेकून दिलास.
स्तोत्रसंहिता 89 : 40 (MRV)
40 तू राजाच्या नगरातील भिंती पाडल्यास. तू त्याचे सर्व किल्ले उध्वस्त केलेस.
स्तोत्रसंहिता 89 : 41 (MRV)
41 लोक जाता जाता त्याच्या वस्तू चोरतात. त्याचे शेजारी त्याला हसतात.
स्तोत्रसंहिता 89 : 42 (MRV)
42 तू राजाच्या सर्व शत्रूंना आनंदी केलेस. तू त्याच्या शत्रूंना युध्द जिंकू दिलेस.
स्तोत्रसंहिता 89 : 43 (MRV)
43 देवा, तू त्यांना स्व:तचे रक्षण करायला मदत केलीस. तू तुझ्या राजाला युध्द जिंकायला मदत केली नाहीस.
स्तोत्रसंहिता 89 : 44 (MRV)
44 तू त्याला युध्द जिंकू दिले नाहीस. तू त्याचे सिंहासन जमिनीवर फेकलेस.
स्तोत्रसंहिता 89 : 45 (MRV)
45 तू त्याचे आयुष्य कमी केलेस. तू त्याला शरम आणलीस.
स्तोत्रसंहिता 89 : 46 (MRV)
46 परमेश्वरा, हे किती काळ चालणार आहे? तू आमच्याकडे सदैव दुर्लक्ष करणार आहेस का? तुझा राग अग्रीसारखा सदैव धुमसत राहाणार आहे का?
स्तोत्रसंहिता 89 : 47 (MRV)
47 माझे आयुष्य किती लहान आहे ते लक्षात ठेव तू आम्हाला छोटे आयुष्य जगण्यासाठी व नंतर मरुन जाण्यासाठी निर्माण केलेस.
स्तोत्रसंहिता 89 : 48 (MRV)
48 कोणीही माणूस जगून कधीही मरणार नाही असे होणार नाही. कोणीही थडगे चुकवू शकणार नाही.
स्तोत्रसंहिता 89 : 49 (MRV)
49 देवा, तू पूर्वी दाखवलेले प्रेम कुठे आहे? तू दावीदला त्याच्या कुटुंबाशी इमान राखण्याचे वचन दिले होतेस.
स्तोत्रसंहिता 89 : 50 (MRV)
50 प्रभु, तुमच्या सेवकाचा लोकांनी कसा अपमान केला होता ते लक्षात ठेवा. परमेश्वरा, तुझ्या शत्रूंनी केलेल्या सर्व अपमानांना मला तोंड द्यावे लागले. त्या लोकांनी तू निवडलेल्या राजाचा अपमान केला.
स्तोत्रसंहिता 89 : 51 (MRV)
51
स्तोत्रसंहिता 89 : 52 (MRV)
52 परमेश्वराला सदैव दुवा द्या. आमेन आमेन.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: