स्तोत्रसंहिता 9 : 1 (MRV)
मी अगदी मनापासून परमेश्वराची स्तुती करतो. परमेश्वरा, तू ज्या अद्भुत गोष्टी केल्या आहेस त्याबद्दल मी सांगेन.
स्तोत्रसंहिता 9 : 2 (MRV)
तू मला खूप सुखी करतोस. सर्वशक्तिमान देवा, मी तुझ्या नामाचा महिमा गातो.
स्तोत्रसंहिता 9 : 3 (MRV)
माझे शत्रू तुझ्यापासून दूर जाण्यासाठी पळाले. परंतु ते पडले आणि त्यांचा नाश झाला.
स्तोत्रसंहिता 9 : 4 (MRV)
तू सगळ्यात न्यायी आहेस तू तुझ्या सिंहासनावर न्यायाधीश म्हणून बसलास. परमेश्वरा, तू माझे गाऱ्हाणे ऐकलेस आणि तू माझा न्यायनिवाडा केलास.
स्तोत्रसंहिता 9 : 5 (MRV)
तू दुसऱ्या लोकांवर टीका केलीस. परमेश्वरा, तू त्यांचा नाश केलास. तू त्यांची नावे जिवंत माणसांच्या यादीतून कायमची पुसून टाकलीस.
स्तोत्रसंहिता 9 : 6 (MRV)
शत्रूचा निपात झाला परमेश्वरा, तू त्यांच्या शहरांचा नाश केलास. आता केवळ पडकी घरे उभी आहेत त्या दुष्ट लोकांच्या आठवणी खातर आता काहीही शिल्लक उरले नाही.
स्तोत्रसंहिता 9 : 7 (MRV)
परंतु परमेश्वर अनंत काळ राज्य करतो. त्याने त्याचे राज्य सामर्थ्यवान बनवले आहे, हे त्याने जगात न्यायव्यवस्था यावी म्हणून केले.
स्तोत्रसंहिता 9 : 8 (MRV)
परमेश्वर पृथ्वीवरील सर्वांनाच न्यायाने वागवतो आणि सर्व देशांनाही तो एकाच मापाने तोलतो.
स्तोत्रसंहिता 9 : 9 (MRV)
खूप लोक सापळ्यात अडकले आणि दुखी झाले कारण त्यांच्या पुढे असंख्य संकटे होती. संकटांच्या ओझ्याखाली ते लोक चेंगरले गेले आहेत. परमेश्वरा, त्यांना आश्रयदेणारी एक चांगली जागा तू बन.
स्तोत्रसंहिता 9 : 10 (MRV)
ज्या लोकांना तुझे नाव माहीत आहे ते तुझ्यावर विश्वास ठेवतात. परमेश्वरा, जर लोक तुझ्याकडे आले, तर त्यांना मदत केल्याशिवाय परत पाठवू नकोस.
स्तोत्रसंहिता 9 : 11 (MRV)
सीयोनमध्ये राहाणाऱ्या लोकांनो, तुम्ही परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराने ज्या महान गोष्टी केल्या त्याबद्दल इतर देशांना सांगा.
स्तोत्रसंहिता 9 : 12 (MRV)
जे परमेश्वराकडे मदतीसाठी गेलेत्यांची आठवण त्याने ठेवली त्या गरीब लोकांना मदतीची याचना केली आणि परमेश्वर त्यांना विसरला नाही.
स्तोत्रसंहिता 9 : 13 (MRV)
मी देवापाशी ही प्रार्थना केली “परमेश्वरा माझ्यावर दया कर, बघ माझे शत्रू मला त्रास देत आहेत. माझे ‘मृत्यूच्या दारा’ पासून रक्षण कर.
स्तोत्रसंहिता 9 : 14 (MRV)
नंतर यरुशलेमच्या द्वारात परमेश्वरा, मी तुझी स्तुती गाईन. तू माझे रक्षण केलेस म्हणून मी खूप आनंदात असेन.”
स्तोत्रसंहिता 9 : 15 (MRV)
ती इतर राष्ट्रे दुसऱ्या लोकांना सापळ्यात पकडण्यासाठी खड्डे खणतात. परंतु ते स्वतच त्या खड्यांत पडले. दुसऱ्यांना पकडण्यासाठी त्यांनी जाळे लावले. परंतु ते स्वतच त्या जाळ्यात अडकले.
स्तोत्रसंहिता 9 : 16 (MRV)
परमेश्वराने त्या वाईट लोकांना पकडले. परमेश्वर वाईट कृत्ये करणाऱ्यांना शिक्षा करतो हे ते शिकले हिग्गायोन.
स्तोत्रसंहिता 9 : 17 (MRV)
जे लोक देवाला विसरतात ते वाईट असतात. ते लोक मृत्युलोकात जातील.
स्तोत्रसंहिता 9 : 18 (MRV)
कधी कधी देव संकटात असलेल्यांना विसरतो असे वाटते. त्या गरीबांना काही आशा नाही असेही वाटते. परंतु देवत्यांना कायमचा कधीच विसरत नाही.
स्तोत्रसंहिता 9 : 19 (MRV)
परमेश्वरा, ऊठ आणि राष्ट्रांचा न्याय कर. आपण सामर्थ्यवान आहोत असा विचार लोकांना करु देऊ नकोस.
स्तोत्रसंहिता 9 : 20 (MRV)
लोकांना धडा शिकव. आपण केवळ माणसे आहोत हे त्यांना कळू दे.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20