स्तोत्रसंहिता 92 : 1 (MRV)
1 परमेश्वराची स्तुती करणे चांगले असते. परात्पर देवा, तुझ्या नावाचे उपकारस्मरण करणे चांगले असते.
स्तोत्रसंहिता 92 : 2 (MRV)
2 तुझ्या प्रेमा बद्दल सकाळी गाणे आणि रात्री तुझ्या इमानीपणाबद्दल जयजयकार करणे चांगले असते.
स्तोत्रसंहिता 92 : 3 (MRV)
3 देवा, तुझ्यासाठी दहा तारांच्या वीणेवर आणि सतारीवर संगीत वाजवणे चांगले असते.
स्तोत्रसंहिता 92 : 4 (MRV)
4 परमेश्वरा, तू ज्या गोष्टी केल्यास त्यामुळे तू आम्हाला खरोखरच सुखी केले आहेस, आम्ही त्याबद्दल आनंदाने गातो.
स्तोत्रसंहिता 92 : 5 (MRV)
5 परमेश्वरा, तू फारच महान गोष्टी केल्यास तुझे विचार समजून घेणे आम्हाला फार जड जाते.
स्तोत्रसंहिता 92 : 6 (MRV)
6 तुझ्याशी तुलना करता माणसे म्हणजे मूर्ख जनावरे आहेत. ज्याला काहीही कळू शकत नाही अशा मूर्खासारखे आम्ही आहोत.
स्तोत्रसंहिता 92 : 7 (MRV)
7 वाईट लोक तणाप्रमाणे जगतात आणि मरतात. ते ज्या कवडीमोलाच्या गोष्टी करतात, त्या गोष्टींचा कायमचा नाश होतो.
स्तोत्रसंहिता 92 : 8 (MRV)
8 परंतु परमेश्वरा, तुला सदैव मान मिळेल.
स्तोत्रसंहिता 92 : 9 (MRV)
9 परमेश्वरा, तुझ्या सगळ्या शत्रूंचा नाश होईल. वाईट गोष्टी करणाऱ्या सर्व लोकांचा नाश होईल.
स्तोत्रसंहिता 92 : 10 (MRV)
10 पण तू मला बलवान बनवशील. मी ताकदवान शिंग असलेल्या मेंढ्यासारखा असेन. पण तू माझी माझ्या खास कामासाठी निवड केलीस. तू तुझे ताजेतवाने करणारे तेल माझ्यावर ओतलेस.
स्तोत्रसंहिता 92 : 11 (MRV)
11 मी माझे शत्रू माझ्याभोवती बघतो. ते भल्या मोठ्या बैलाप्रमाणे माझ्यावर चालकरुन येण्याच्या तयारीत आहेत. ते माझ्याबद्दल काय बोलतात ते मी ऐकतो.
स्तोत्रसंहिता 92 : 12 (MRV)
12 परंतु चांगला माणूस वाढणाऱ्या खजुराच्या झाडाप्रमाणे असतो.चांगला माणूस लबानोनमधल्या मोठ्या देवदार वृक्षासारखा असतो.चांगली माणसे परमेश्वराच्या मंदिरात लावलेल्या मजबूत वृक्षासारखी असतात. आमच्या देवाच्या मंदिरातील अंगणात ती झपाट्याने वाढतील.
स्तोत्रसंहिता 92 : 13 (MRV)
13
स्तोत्रसंहिता 92 : 14 (MRV)
14 ते जुने झाल्यावरही फळे देत राहातील. ते सशक्त हिरव्या झाडासारखे असतील.
स्तोत्रसंहिता 92 : 15 (MRV)
15 परमेश्वर चांगला आहे हे प्रत्येकाला दाखवण्यासाठी ती (चांगली माणसे) तेथे आहेत तो माझा खडक असून तो काहीही चुकीचे करत नाही.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: