परमेश्वराने नवीन आणि अद्भुत गोष्टी केल्या म्हणून त्याच्यासाठी नवीन गाणे गा.
स्तोत्रसंहिता 98 : 2 (MRV)
त्याच्या पवित्र उजव्या बाहूने त्याच्याकडे विजय परत आणला.
स्तोत्रसंहिता 98 : 3 (MRV)
परमेश्वराने राष्ट्रांना त्याची उध्दाराची शक्ती दाखवली. परमेश्वराने त्यांना त्याचा चांगुलपणा दाखवला.
स्तोत्रसंहिता 98 : 4 (MRV)
त्याच्या भक्तांना इस्राएलाच्या लोकांशी असलेला देवाचा प्रामाणिकपणा आठवला. दूरच्या प्रदेशातील लोकांना देवाची वाचवण्याची शक्ती दिसली.
स्तोत्रसंहिता 98 : 5 (MRV)
पृथ्वीवरच्या प्रत्येक माणसा, परमेश्वराचा जयजयकार कर. त्वरेने त्याचे गुणवर्णन करायला सुरुवात कर.
स्तोत्रसंहिता 98 : 6 (MRV)
वीणे, परमेश्वराची स्तुती करा. वीणेच्या झंकारांनो, त्याची स्तुती करा.
स्तोत्रसंहिता 98 : 7 (MRV)
कर्णे आणि शिंग वाजवून आपल्या राजाचे, परमेश्वराचे गुणवर्णन करा.
स्तोत्रसंहिता 98 : 8 (MRV)
समुद्र, पृथ्वी आणि त्यावरील सर्व वस्तूंना जोर जोरात गाऊ द्या.
स्तोत्रसंहिता 98 : 9 (MRV)
नद्यांनो, टाळ्या वाजवा पर्वतांनो, सगळ्यांनी बरोबर गाणे गा. [10] परमेश्वरासमोर गा. कारण तो जगावर राज्य करायला येत आहे. तो जगावर न्यायाने राज्य करेल, तो लोकांवर चांगुलपणाने राज्य करेल.