प्रकटीकरण 22 : 1 (MRV)
नंतर देवदूताने मला जीवनाच्या पाण्याची एक नदी दाखविली. ती नदी स्फटिकासारखी स्पष्ट होती. ती नदी देवाच्याआणि कोकऱ्यांच्या राजासनापासून उगम पावत होती.
प्रकटीकरण 22 : 2 (MRV)
आणि नगराच्या रस्त्यांच्या मधोमध वाहत होती. नदीच्या दोन्हीकाठांवर उगवलेली झाडे जीवनाची झाडे होती. त्यांच्यातील प्रत्येक झाड दरमहा आपले फळ देते. झाडांची पाने राष्ट्रांनाआरोग्य देण्यासाठी उपयोगी पडत होती.
प्रकटीकरण 22 : 3 (MRV)
त्या नगरात यापुढे कसलाही शाप असणार नाही. देवाचे सेवक त्याची उपसनाकरतील.
प्रकटीकरण 22 : 4 (MRV)
आणि ते त्याचे मुख पाहतील. व त्यांच्या कपाळावर देवाचे नाव लिहिलेले असेल.
प्रकटीकरण 22 : 5 (MRV)
त्या नगरात यापुढे कधीहीरात्र होणार नाही. लोकांना प्रकाश मिळविण्यासठी ह्यापुढे कुठल्याही दिव्याची अथवा सूर्याची गरंज पडणार नाही; कारण प्रभुदेव आपला प्रकाश त्यांना पुरवील. आणि ते लोक अनंतकाळ राज्य करतील.
प्रकटीकरण 22 : 6 (MRV)
नंतर देवदूत मला म्हणाला, “हे शब्दविश्वासयोग्य आणि खरे आहेत. जो प्रभु संदेष्ट्यांच्या आत्म्यांचा प्रभु आहे, त्याने आपला दूत पाठविला. ज्या गोष्टी लवकरघडून आल्या पाहिजेत, त्या आपल्या सेवकांना दाखवून देण्यासाठी त्याने आपला दूत पाठविला आहे.”
प्रकटीकरण 22 : 7 (MRV)
“पाहा, मी लवकरयेत आहे. या पुस्तकातील संदेशवचनांचे जो पालन करतो, तो धन्य!”
प्रकटीकरण 22 : 8 (MRV)
ज्या मनुष्याने या गोष्टी ऐकल्या आणि त्यांनी पाहिल्या तो मनुष्य मी, योहान आहे. मी जेव्हा या गोष्टी ऐकल्या आणिपाहिल्या, तेव्हा या गोष्टी मला दाखवीत असलेल्या देवदूताच्या पाया पडून मी त्याची उपासना करु लागलो.
प्रकटीकरण 22 : 9 (MRV)
परंतु तोदेवदूत मला म्हणाला, “असे करु नको. मी तुझ्याबरोबर आणि तुझे भाऊ संदेष्टे, जे ह्या पुस्तकात नमूद केलेल्या वचनांचेपालन करतात, त्यांच्याबरोबर काम करणारा देवाचा एक सेवक आहे. देवाची उपासना कर!”
प्रकटीकरण 22 : 10 (MRV)
नंतर देवदूत मला म्हणाला,“भावी काऴाबाबतच्या या पुस्तकातील संदेश गुप्त ठेवू नकोस; कारण या गोष्टी घडून येण्याची वेळ आता जवळ आली आहे.
प्रकटीकरण 22 : 11 (MRV)
जे मनुष्य अयोग्य वागतो. तो आणखी चुकीचे वर्तन करीत राहू दे! जो मलिन आहे, त्याला आणखी मलिन राहू दे! जोमनुष्य पवित्र आहे, त्याला आणखी पवित्रपणाने चालू दे.”
प्रकटीकरण 22 : 12 (MRV)
“पाहा! मी लवकर येत आहे, आणि माझे वेतन तुमच्याकरिता घेऊन येईन. प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार मी फळदेईन.
प्रकटीकरण 22 : 13 (MRV)
मी अल्फा व ओमेगा, पहिला व अखेरचा, आरंभ आणि शेवट आहे.
प्रकटीकरण 22 : 14 (MRV)
“जे आपले झगे साफ धुतात, ते धन्य! त्यांना जीवनी झाडाचे फळ खाण्याचा आणि वेशीतून नगरामध्ये जाण्याचा हक्कराहील.
प्रकटीकरण 22 : 15 (MRV)
परंतु “कुत्रे” चेटकी, जादूटोणा करणारे, व्यभिचारी, मूर्तिपूजा करणारे, आणि निरनिराळ्या रीतीने लबाडीकरणारे व लबाड बोलणारे बाहेर राहतील.
प्रकटीकरण 22 : 16 (MRV)
“तुमच्या आपापल्या मंडळ्यांसाठी याबाबतीत साक्ष देण्याकरिता आपला देवदूत मी, येशूने पाठविलेला आहे. मीदाविदाच्या कुळातील एक अंकुर व वंशज आणि पहाटेचा तेजस्वी तारा आहे.”
प्रकटीकरण 22 : 17 (MRV)
आत्मा आणि नवरी असे म्हणतात की,“ये! आणि जो कोणी हे ऐकतो, तो असे म्हणो की, “ये!” आणि जो तहानेला आहे, तो येवो, ज्या कोणाला पाहिजे, तोफुकट दिले जाणारे जीवनी पाणी घेवो.
प्रकटीकरण 22 : 18 (MRV)
या पुस्तकात भविष्याकाळाबाबत नमूद केलेली वचने जो ऐकतो, त्याला मीगंभीरपणे सावधान करतो: जर कोणी ह्यामध्ये भर घालील, तर या पुस्तकात लिहिलेल्या पीडा देव त्याच्यावर आणिल.
प्रकटीकरण 22 : 19 (MRV)
आणि जो कोणी भविष्याकाळाबाबत संदेश देणाऱ्या या पुस्तकामधून काही काढून टाकील, त्याचा ज्यांच्याबाबत यापुस्तकात लिहिले आहे, त्या जीवनाच्या झाडाचा आणि पवित्र नगराचा वाटा देव काढून घेईल.
प्रकटीकरण 22 : 20 (MRV)
जो येशू या गोष्टीविषयीसाक्ष देतो, तो म्हणतो, “होय, मी लवकर येतो.”आमेन, ये प्रभु येशू, ये!
प्रकटीकरण 22 : 21 (MRV)
प्रभु येशूची कृपा देवाच्या सर्व लोकांबरोबर असो.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: